कोकण

जि. प.मधील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पद रद्द

CD

जिल्हा परिषद मधील
पशुसंवर्धन अधिकारी पद रद्द
उपायुक्तांकडे पदभार ; पशुधनासोबत दुग्ध व्यवसाय विभागाचे एकत्रीकरण
रत्नागिरी, ता. ४ः राज्यशासनाने उपायुक्त पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे एकत्रीकरण केल्यामुळे जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पद रद्द केले आहे. या पदाचा भार यापुढे उपायुक्त पशुसंवर्धनकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून हे बदल झालेले आहेत. या पदावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त यांचे दुहेरी नियंत्रण राहणार आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभाग आणि राज्यशासनाकडील दुग्धव्यवसाय विभागाच्या एकत्रीकरणाचे वारे सुरू आहेत. याबाबतचे आदेश पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी काढले आहेत. या आदेशात १ जुलै २०२५ पासून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे काम पशुसंवर्धन उपायुक्त पाहणार आहेत तसेच जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी या पदाचे समायोजन लवकरच करण्यात येणार आहे.
शासनाने यापूर्वीच तालुकापातळीवर तालुका लघुचिकित्सालय अधिकारी आणि तालुका पशुसंवर्धनी अधिकारी वर्ग-१ असे पद निर्माण केले आहे. लवकरच ही पदे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सेवाज्येष्ठतेने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन डॉक्टरांचे समायोजन करण्यात येणार आहे. या पदावरील जनावरांच्या डॉक्टरांच्या अधिकारात तालुक्यातील पशुधनासोबत दुग्ध व्यवसाय त्यात होणारी भेसळ रोखणे, पशुच्या खाद्याचे कारखाने यांचे नियंत्रण येणार आहे. पशुसंवर्धन विभागात असा मोठा बदल होणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या पदावर वर्ग-१ कनिष्ठ स्तरातील अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती; मात्र आता यापुढे या पदावर वर्ग-१ वरिष्ठ स्तर म्हणून अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. आता या अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र संबंधित तालुक्यापुरते मर्यादित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar Azam च्या कारकीर्दिला पूर्णविराम? पाकिस्तानने संघातून केली हकालपट्टी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर झाला 'गेम'

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

Crime: 'तुमच्या आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग झालेय’, सरकारी अधिकाऱ्याची फसवणूक; ४९ लाख रुपयांचा गंडा

Latest Marathi News Live Update : आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदत जाहीर करा- अन्यथा परीणाम भोगावे लागतील- राजू शेट्टी

T20 WC, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी पाहून गौतम गंभीर क्युरेटरवर संतापला? सेमीफायनलपूर्वी ड्रामा, त्या व्हायरल फोटोमुळे चर्चा

SCROLL FOR NEXT