कोकण

मालवण येथे २० जुलैला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

CD

मालवण येथे २० जुलैला
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
मालवण, ता. ४ : येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी विद्यार्थी अनिकेत फाटक व अमृता फाटक पुरस्कृत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. २० जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता येथील भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.
ही स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटांत होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही गटांत प्रशालेने व महाविद्यालयाने तीन स्पर्धकांना पाठवायचे आहे. आठवी ते दहावी या शालेय गटासाठी सिंधुदुर्ग किल्ला, स्वच्छता हीच सेवा, तुमचे आदर्श व्यक्तित्त्‍व, व्यसनाधीनता, भारतीय सैन्याचे सामर्थ्य हे विषय, तर अकरावी ते पंधरावी या महाविद्यालयीन गटासाठी भविष्यातील भारतासाठी युवकांचे योगदान, पर्यावरण व मानवी जीवन, युवा पिढी समोरील समस्या व आव्हाने, स्व-आधारित जीवनशैली, भारतीय सैन्याचे सामर्थ्य असे विषय आहेत. दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये, तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच दोन्ही गटांत प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहेs. या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी ॲड. प्रथमेश सामंत यांनी सन्मानचिन्हे पुरस्कृत केली आहेत. या स्पर्धेत वक्तृत्वासाठी स्पर्धकास सात मिनिटांचा वेळ दिला जाईल. शाळांनी १५ जुलैपर्यंत स्पर्धक नोंदणी करावी. नोंदणी व माहितीसाठी स्पर्धाप्रमुख-अनिकेत फाटक, अॅड. पलाश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT