कोकण

-निर्माणधीन नकारात्मकता त्यागून शेतीकडे वळावे

CD

-rat४p१३.jpg-
२५N७५२१३
आदिवासी शेतकऱ्यांना तूरबियाणे वाटप करताना जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले.
----------
नकारात्मक मानसिकता त्यागून शेतीकडे वळा
शिवकुमार सदाफुले ः तिडेत चारसूत्री लागवड प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मंडणगड तालुक्याला नैसर्गिक वरदान लाभले असून, उपलब्ध साधनांच्या आधारे कृषिक्षेत्रात येथे खूप काही करण्यासारखे आहे. विविध कारणांनी शेतीविषयी निर्माण झालेली नकारात्मक मानसिकता त्यागून शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांनी केले.
मंडणगड तालुक्याच्या क्षेत्रीय पाहणी दौऱ्यावर ते आले असता बोलत होते. त्यांनी विविध क्षेत्रांना भेट दिली. आदिवासी शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिमेंतर्गत मौजे तिडे येथे शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना तूर बियाणे वाटप करण्यात आले तसेच धरती आबा योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे पीएम किसान पीव्हीटीजीअंर्तगत अर्ज भरून घेण्यात आले. तिडे येथील फकीर चिखलकर यांच्या क्षेत्रावर कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये शिवकुमार सदाफुले यांनी चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली. या वेळी तिडे सरपंच मुमताज धनसे, उपसरपंच राजू यादव व शेतकरी उपस्थित होते. कळकवणे येथील शेतकरी मिलिंद पवार यांच्या काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून मार्केटिंगाबाबत मार्गदर्शन केले. पालकोंड येथे शेतकरी सहदेव माळी यांच्या क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या काजू बागेस भेट दिली. देव्हारे येथील निर्मळ शेतकरी महिला बचतगटातील महिलांना नाचणी दापोली २ या वाणाचे ठोंबा पद्धतीने करण्यात येणाऱ्या लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले. रत्नागिरी ८ या भातबियाण्याचे २५०० किलो तसेच नाचणी दापोली २ या बियाण्याचे २३० किलो, तूर बीडीएन ७१८ या बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

SCROLL FOR NEXT