कोकण

घराचे पत्रे तुटल्यामुळे टेंबवली येथे नुकसान

CD

75294


घराचे पत्रे तुटल्यामुळे
टेंबवली येथे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः तालुक्याच्या किनारी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील टेंबवली येथील एका घराच्या छप्पराचे पत्रे उडून सुमारे ४५ हजारांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेने माहिती घेतली. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे ३० मिलिमीटर (एकूण १४८३ मिलीमीटर) इतकी पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या किनारी भागांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे ओढ्यांना पूरसदृशस्थिती निर्माण झाली. किनारी भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आज सकाळच्या सुमारास तालुक्यातील टेंबवली येथील एका घराच्या छपराचे पत्रे उडून गेले. महसूल यंत्रणेने नुकसानीचा पंचनामा केला. सायंकाळीही येथे जोराच्या सरी बरसल्या. आकाश काळवंडून येऊन सरी कोसळत होत्या. सततच्या पावसामुळे वातावरणात गारठा पसरला होता. पावसामुळे भात लावणीला पाणी मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. आतापर्यंत तालुक्यात १४८३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. दरम्यान, रविवारी (ता.६) आषाढी एकादशी असल्याने पावसाचा जोर असाच कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT