लांज्यात ई-चलन अॅपवरून
मिळाली चोरीची दुचाकी
रत्नागिरीतून झाली चोरी; संशयित ताब्यात
लांजा, ता. ४ ः पोलिसांनी शहरात नियमित नाकाबंदी केली होती. त्यात एक दुचाकीस्वार पोलिसांना पाहून न थांबताच निघून गेला. त्यामुळे शंका आलेल्या लांजा पोलिसांनी ई-चलन ॲपवरून माहिती घेतली आणि ही दुचाकी रत्नागिरीतून चोरी झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वेगाने हालचाली करून या दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे.
लांजा शहरातील आसगे कोर्लेफाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या दरम्यान दुचाकी (एमएच ०८, एएस २४१८) घेऊन एकजण तेथे आला. तो न थांबता निघून गेल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्या दुचाकीची ई-चलन ॲपवर त्यांनी माहिती घेतली. तेव्हा ही दुचाकी २०२४ मध्ये चोरी झाली असल्याची आणि रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई किशोर पवार व महिला हवालदार साक्षी भुजबळराव यांनी दुचाकीस्वाराचा शोध सुरू केला. तो लांजा-आगरवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला दुचाकीसह चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.