75469
साळिस्ते शाळेत शिक्षण परिषद
तळेरे, ता. ५ : साळिस्ते केंद्राची पहिली शिक्षण परिषद केंद्रशाळा साळिस्ते क्र.१ येथे झाली. साळिस्ते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांनी दीपप्रज्वलन व समीर ताम्हणकर यांनी सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण केला. या शिक्षण परिषदेत पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांचे स्वरचित गीत ‘तुम्ही साळिस्त्याक येवा नि बघून जावा’ हे स्वागत पद्य उपस्थितांना भावले. या गीताला संगीत हार्मोनियम साथ पारधिये, तबला साथ शाळेचा विद्यार्थी अर्णव रांबाडे याने दिली. हे गीत पारधिये यांनी लिहिले असून, त्याला संगीतही त्यांनीच दिले आहे. केंद्रप्रमुख जाधव यांनी पारधिये यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या परिषदेला मार्गदर्शक म्हणून पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर, उपशिक्षक विश्वनाथ चव्हाण होते. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी संगीता वळवी, माधवी बुचडे, शाळेचे मुख्याध्यापक संजना ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली. दिनेश जंगले यांनी आभार मानले.
.................
75470
दापोली कृषी महाविद्यालयात
डॉ. कुणकेरकर यांना पदोन्नती
सावंतवाडी, ता. ५ ः सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुणकेरकर यांना कृषी महाविद्यालय दापोली येथे पदोन्नती मिळाली आहे. डॉ. कुणकेरकर तालुक्यातील कुणकेरी येथील मूळ रहिवासी आहेत. कुणकेरी पूर्ण प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी वेंगुर्ले येथील वसतिगृहात राहून पूर्ण केले होते. घरची परिस्थिती बिकट असतानाही दापोली कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. तेथे जिद्दीने व कष्टाने पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली सेवा कोकण कृषी विद्यापीठातच सुरू ठेवली होती. नोकरी आणि संशोधन यामध्ये समन्वय साधत त्यांनी या पदावर आपली मोहर उठविली. त्यांच्या या नियुक्तीबाबत फुले, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी आपल्या पदाचा पदभार मंगळवारी (ता. १) स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.