कोकण

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये दुमदुमला विठुनामाचा जयघोष

CD

75472


बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये
दुमदुमला विठूनामाचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः पंढरपूर निवासी विठूमाऊलीच्या आषाढी वारीचे औचित्य साधून येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये उत्साही व भक्तिमय वातावरणात वारकरी दिंडी पार पडली. विद्यार्थ्यांचा उत्साह सर्वांनीच कॅमेऱ्यात कैद केला.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांना अग्रक्रम देत असते. आषाढी वारीचे निमित्त साधून शुक्रवारी (ता. ४) नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वारीचे आयोजन करण्यात आले. वारकरी स्त्री-पुरुषांच्या वेशात विद्यार्थी सहभागी झाले. टाळ-मृदंगाच्या साथीने ‘या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ असा विठूनामाचा गजर करीत प्रशालेपासून ते ब्राह्मणदेव मंदिरापर्यंत पायी वारी काढली. वारी ब्रह्मदेव मंदिरात विसावल्यावर वारकरी भजनाचे शिक्षकांकडून सादरीकरण करण्यात आले. त्याला सर्व वारकऱ्यांनी भक्तिभावाने साथ दिली. सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले. वारीमध्ये मुलांसह शिक्षकांनीही वारकरी वेषात मनमुराद आनंद लुटला. वारीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठूमाऊलीला भेटून आल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, प्रा. चैताली बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कानडे आदींनी वारीचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT