कोकण

‘कोमसाप’चा लवकरच ‘साहित्य मिरगोत्सव’

CD

‘कोमसाप’चा लवकरच
‘साहित्य मिरगोत्सव’
सावंतवाडी, ता. ५ ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी नूतन कार्यकारिणीची बैठक सावंतवाडी विश्रामगृह येथे झाली. यावेळी कार्यकारिणीचा विस्तार करताना तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी सल्लागार समिती व निमंत्रित सदस्यांची कार्यक्रम समिती जाहीर केली. तसेच लवकरच ‘साहित्य मिरगोत्सव’ हा अभिनव उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा सदस्य संतोष सावंत, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ॲड. नकुल पार्सेकर, सहसचिव विनायक गांवस, सदस्य मंगल नाईक-जोशी, प्रज्ञा मातोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी सल्लागार समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, ॲड. अरुण पणदूरकर, उषा परब, प्रा. गणपत शिरोडकर, प्रा. सुभाष गोवेकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम समितीमध्ये सुश्मिता चव्हाण, ऋतुजा सावंत भोसले, रामदास पारकर, प्रा. रुपेश पाटील, अभय नेवगी, दीनानाथ नाईक यांची नियुक्ती केल्याचे तालुकाध्यक्ष पटेकर यांनी जाहीर केले.
................
देवगड हायस्कूलमध्ये
मंत्रिमंडळ निवडणूक
देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक मतदान प्रक्रियेद्वारे घेण्यात आली. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रिया जशी चालते, त्यानुसार सर्व व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती होण्यासाठी हा उपक्रम घेतला. यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवार, बोटाला शाई लावणे, उमेदवारांचे अनुमोदक या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये जाऊन मत दिले. सर्व मतदारांना चिठ्या दिल्या होत्या. या मतदान प्रक्रियेला हायस्कूलच्या स्थानीय समितीचे सचिव अ‍ॅड. अविनाश माणगावकर, उपाध्यक्षा अर्चना नेने, सदस्य अनुश्री पारकर यांनी भेट दिली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर आणि निवडणूक विभाग समितीमधील राजेंद्र कोयंडे, सुरेश पवार, आफरीन पठाण, प्रसाद शेवडे आणि उमेश कोयंडे यांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT