कोकण

फिनोलेक्सच्या विद्यार्थ्यांचे यश

CD

फिनोलेक्स अॅकॅडमीच्या
विद्यार्थ्यांचे यश
रत्नागिरी ः फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या पदवी परीक्षेत यश संपादन केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात मिसबाह काझी हिने द्वितीय क्रमांक व जयेश पार्टे याने पाचवा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

रसायनशास्त्राच्या
विद्यार्थ्यांची इंटर्नशिप
रत्नागिरी ः देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत दहादिवसीय इंटर्नशिप कार्यक्रम झाला. विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी याचे नियोजन करण्यात आले होते. द्वितीय वर्षातील रसायनशास्त्र विषयामध्ये आवड असणाऱ्या ४ विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली. या विद्यार्थ्यांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधील चिदानंद मगदूम यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होत्या.

रेल्वे सवलतीबाबत
पंतप्रधानांना पत्रे
रत्नागिरी ः रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी पंतप्रधानांना रेल्वेभाड्यातील सवलत पूर्ववत सुरू करण्याबाबतचे वैयक्तिक पत्र सामूहिकरीत्या पाठवले. ही सवलत कोरोनापूर्वी मिळत होती; परंतु कोरोना महामारीनंतर ही सवलत बंद करण्यात आली. त्यामुळे फेस्कॉम कोकण विभागाकडून पत्र लिहिण्याची मोहीम उघडण्यात आली. त्यात रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सक्रिय भाग घेतला. पंतप्रधान या प्रश्नात स्वतः लक्ष देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागातील अडथळे त्वरित दूर करतील, अशी अपेक्षा रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT