
Kolhapur MLA case police arrest brother sister for attempting online extortion
Esakal
कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आलीय. याआधी एका तरुणाला अटक करण्यात आली होती. आता त्या तरुणाच्या बहिणीलासुद्धा अटक केली आहे. बहीण-भावाने मिळून आमदार शिवाजी पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झालाय.