भातपीक स्पर्धेत दुर्गोली प्रथम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः येथील कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या भातपीक स्पर्धेत नारायण दुर्गोली (गाव, वीर) यांनी प्रथम क्रमांक, तर सुनील शिंदे (शिरगाव) यांनी द्वितीय आणि रुक्मिणी रहाटे (मिरवणे) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नाचणीच्या स्पर्धेत मुर्तवडे येथील सुरेश शिगवण यांना गौरवण्यात आले.
चिपळूण तालुक्याची भातपिकाची सरासरी उत्पादकता २६.५३ क्विंटल असून, नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता १२.८८ क्विंटल आहे. या स्पर्धेत भातपिकासाठी एकूण २५ अर्ज प्राप्त झाले होते, तर नाचणी पिकासाठी २ अर्ज प्राप्त झाले होते. तालुक्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा दीडपट किंवा त्याहून अधिक उत्पादकता नोंदवणाऱ्या शेतकरी पीक स्पर्धा पुरस्कारासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र ठरले आहेत. पुढील खरीप हंगामात (२०२५) देखील पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.