-rat५p२५.jpg-
२५N७५४९९
राजापूर ः मुलांनी काढलेल्या वारकरी दिंडीमध्ये फुगडी खेळताना शिक्षक.
-rat५p२७.jpgः
२५N७५५०१
श्री पांडुरंगाच्या वेषभूषेतील आरएसपीएम स्कूलचा विद्यार्थी.
-rat५p२८.jpg ः
२५N७५५०२
माऊलीची पालखी खांद्यावर घेत सहभागी झालेले आरएसपीएम स्कूलचे विद्यार्थी.
----
राजापुरात आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ : हातामध्ये दिंड्या अन् भगव्या पताका घेऊन पायी वारी करत निघालेल्या वारकऱ्यांना सर्वसामान्यांचे दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीनिमित्ताने रविवारी (ता. ६) दर्शनाचे वेध लागले आहेत. असे असताना राजापूरमध्ये अवघी पंढरी अवतरली होती. शहरातील आरएसपीएम स्कूल, शीळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. २ आणि अंगणवाडीतील चिमुकल्या वारकऱ्यांनी वेशामध्ये खांद्यावर पालखी, हातामध्ये भगवी पताका अन् डोक्यावर तुळशी वृंदावन घेत टाळमृदंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा जयघोष केला. त्यातून, राजापूर अवघे पंढरीमय झाले होते.
शहरातील आरएसपीएम स्कूल आणि शहानजीकच्या शीळ येथील शाळेतील मुलांनी आज वारकरी दिंडी काढत साऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवले. या दिंडीमध्ये चिमुकली मुले कपाळी टिळा लावून वारकऱ्यांच्या वेशामध्ये सहभागी झाली होती तर, मुली डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचा जयघोष करत होत्या. खांद्यावर पालखी, हातामध्ये भगवी पताका अन् डोक्यावर तुळशी वृंदावन अशा निघालेल्या पायी दिंडीमध्ये हातातील टाळांच्या नादामध्ये चिमुकल्या वारकऱ्यांच्या मुखातून केल्या जाणाऱ्या विठुमाऊलीच्या जयघोषाने अवघी पंढरी अवतरली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.