75710
शेवंतीच्या पाकळीवर साकारले विठुराया
तळेरे, ता. ६ : आषाढी एकादशीचे निमित्त साधून कासार्डे जांभळवाडी येथील शिवाजी डोईफोडे या अवलिया कलाकाराने शेवंती फुलाच्या पाकळीवर विठुरायाची सुबक प्रतिमा साकारली आहे.
शिक्षणाबरोबरच डोईफोडे यांनी चित्रकारितेचा छंद जोपासला आहे. त्यातून त्यांना चित्रकलेच्या व्यवसायाची आवड निर्माण झाली. सध्या रोजगाराचे साधन म्हणून ते पेंटिंगची कामे करत आहेत. यातूनच एक भक्तीचा मार्ग म्हणून आषाढी एकादशीचे औचित्य साधून डोईफोडे या अवलिया कलाकाराने शेवंतीच्या फुलाच्या पाकळीवर विठुरायाची अत्यंत सुबक प्रतिमा साकारली आहे.