75724
करंजे, कसवणमध्ये ठाकरे गटाला धक्का
कार्यकर्ते भाजपमध्ये; पालकमंत्र्यांकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : करंजे (ता. कणकवली) येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येथील ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश झाला. पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. कसवणसह करंजे गावातही ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
यामध्ये विनायक कांबळे (भिरवंडेकर), नीलेश कदम, सुनील जाधव, सतीश कदम, लक्ष्मण कदम, रविराज कदम, विनय कदम, किशोर कदम, श्रीकांत कदम, विशाल कदम, अनिकेत कदम, प्रियांका कदम, सोनल कदम, ज्योत्स्ना कदम सुरेखा जाधव, सविता कदम, प्रणाली कदम, सुमन कदम, सौरभ कदम यांचा समावेश आहे.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी गावच्या विकासासाठी जो काही निधी लागेल किंवा आमची जी काही मदत लागेल ती अवश्य करू, असा विश्वासदेखील प्रवेशकर्त्यांना दिला. भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, करंजे सरपंच सपना मेस्त्री, माजी उपसरपंच राजन चिंदरकर, अनिल सावंत, माजी सरपंच मंगेश तळगावकर,
आशितोष मेस्त्री आदी उपस्थित होते.
---
कसवण सरपंच कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये
कणकवली : कसवणचे (ता. कणकवली) सरपंच मिलिंद सर्पे आणि सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे ठाकरे गटाला एकप्रकारचा धक्काच मानला जात आहे. शरद सर्पे, तुषार सर्पे, आयुष साळसकर, दशरथ सर्पे, अभिमन्यू सर्पे, पद्माकर सर्पे, प्रकाश कासले, राजाराम सर्पे, पुंडलिक सर्पे, सिद्धार्थ कांबळे, आकाश सर्पे आदींनी प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.