कोकण

गुरूकुलची मुलं पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग

CD

युनायटेड स्कूलमध्ये पायी दिंडी
चिपळूण, ता. ८ ः युनायटेड इंग्लिश स्कूलमधील गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी आणि सांघिक सांगीतिक भजनसेवेचा अनुभव आनंद घेतला.
आषाढी एकादशीदिवशी साप्ताहिक सुटीचा असूनही गुरुकुलातील सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. त्यानंतर भगवान परशुरामांचे दर्शन घेऊन मार्कंडीकडील प्रवेशद्वाराने चिंचनाका नगरपालिका या मार्गाने पांडुरंगाच्या नामघोषात, टाळांच्या गजरात दिंडीत सहभागी होऊन खेंडीतील विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचले. विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीमुळे गजबजलेल्या विठ्ठल मंदिरात सुरेल भजनं सादर केली. गणपती, पांडुरंगाच्या श्लोकांनी आणि हरी जय जय राम कृष्ण हरी मंत्राने सुरू झालेल्या भजनसेवेत सुरभी चितळे हिने रूप पाहता लोचनी आणि पद्मनाभा नारायणा, प्रांजल सुरवसेने सुंदर ते ध्यान आणि घेई घेई माझे वाचे, अवंतिका जाधवने खेळ मांडिलेला वाळवंटी काठी, अनुश्री भागवतने नैवेद्य आणिला तुझं पांडुरंगा व वृंदावनी वेणू, गंधार नाईकने विठू माऊली तू तर मेघ देवळेकरने ज्ञानियांचा राजा अशी अभंग भक्तिगीते सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump यांचे Nobel चे स्वप्न धुळीस मिळाले; व्हाईट हाऊसचा संताप उफाळला, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Thane News: दिवाळीनिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल, काय असतील पर्यायी मार्ग?

Gold Rates: खुशखबर! सोनं 2600 रुपयांनी तर चांदी 4000 रुपयांनी स्वस्त; आजचे भाव काय?

गजवा-ए-हिंद २०४७... महाराष्ट्र हादरला! पनवेल-नांदेड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार, अविनाश धर्माधिकारी यांची पोस्ट व्हायरल

Child Phlegm Remedy: बाळाला कफाने त्रास होतोय? मग हे दोन घटक वापरून घरगुती उपाय करा!

SCROLL FOR NEXT