कोकण

रत्नागिरीत बॅंक कर्मचाऱ्यांचा संप, निदर्शने

CD

- rat९p१२.jpg-
२५N७६३८६
रत्नागिरी : कामगार कायद्यांविरोधात बुधवारी देशव्यापी संपावेळी शिवाजीनगर येथे ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे निदर्शने करताना बॅंकिंग उद्योगातील कर्मचारी.
-------
रत्नागिरीत बॅंक कर्मचाऱ्यांची निदर्शने
कामगार कायद्यांविरोधात संप; दैनंदिन व्यवहारांवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : केंद्र सरकारच्या जनहितविरोधी व कामगारहित विरोधी धोरणांच्या विरोधात पुकारलेला देशव्यापी संप रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी झाल्याचा दावा आज बॅंकिंग उद्योगातील संघटनांनी केला आहे. देशभरात १० केंद्रीय कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथे बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर बॅंक कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून निषेध नोंदवला.
केंद्र सरकार चार नवीन कामगार कायदे करत आहे. त्याच्या संहितांना विरोध या प्रमुख मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. बँकिंग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही अग्रणी संघटना संपामध्ये सामील झाली. या संपाचे व निदर्शनांचे नेतृत्व विनोद कदम, मनोज लिंगायत (बँक ऑफ इंडिया) व भाग्येश खरे (बँक ऑफ महाराष्ट्र), दीपक वैद्य (युनियन बँक ऑफ इंडिया), विजय होलम (कॅनरा बँक), अनिल पवार (फेडरल बँक) यांनी केले. सार्वजनिक बँकांचे सशक्तीकरण करा, सर्व खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करा, बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात नोकरभरती करा, सर्वसामान्य ठेवीवरील व बचतीवरील व्याजदरामध्ये वृद्धी करा, ग्राहकांवर लादण्यात येणारी विविध सेवाशुल्के रद्द करा, अशा विविध मागण्या केल्याची माहिती या वेळी संपकऱ्यांनी दिली. दरम्यान, संपामुळे आज दिवसभर बँकांचे कामकाज बंद राहिल्याने त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर झाला.
----
चौकट
विरोधाची कारणे
नवीन कामगार कायदे लागू झाल्यास कोणत्याही क्षेत्रात, कारखान्यांमध्ये, उद्योगांमध्ये कामगार संघटना स्थापन करणे दुरापास्त होईल. संविधानाने दिलेला कामगारांचा संप करण्याचा हक्कदेखील पूर्णतः डावलण्यात येईल. सध्याचे किमान वेतन, सामाजिक सुरक्षितता, महिलांना मिळणाऱ्या खास सवलती या सर्व देखील या नवीन कायद्यामुळे संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे कामगारांनी या कायद्यांना विरोध केला आहे.
-----
कोट
छोटे उद्योजक व शेतकरीवर्गासाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात यावीत. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी कठोर कायदे करावेत. हेतुपुरस्सर बँक कर्ज थकवणे हा फौजदारी गुन्हा समजण्यात यावा, या व अन्य विविध मागण्या ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज संघटनेने केल्या आहेत.
- भाग्येश खरे, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! ४ पिढ्यांचा पडद्यामागचा काळा इतिहास

Mill Workers: गिरणी कामगार पुन्हा आक्रमक, हक्काच्या घरासाठी आंदोलन छेडणार

WhatsApp Services : नेट स्लो नाहीतर, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन...! स्क्रोलिंग करताना अडचण येतीय? मग 'ही' ट्रीक वापरा

Latest Marathi News Updates:विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरुन वाद, एका तरुणाचा खून

3D Photo Prompt : फ्रीमध्ये तुमचे '3D स्टाईल' (थ्री डी) फोटो बनवा, एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT