कोकण

गजानन महाराज मंदिरात आज गुरुपौर्णीमा

CD

गजानन महाराज
मंदिरात आज गुरूपौर्णिमा
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील गजानन महाराज मंदिर येथे गुरूवारी (ता. १०) गुरूपौर्णिमेनिमित्त सायंकाळी ४.३० वाजता गजानन विजयमधील २१व्या अध्यायाचे वाचन, ५ वा. संजीवनी जामखेडकर यांचे प्रवचन, ५.३० वा. विवेकानंद नगर येथील महिला मंडळाचे भजन, ६.४५ वा. नामस्मरण, ७ वा. आरती असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रमात सहभागी होऊन श्रींची सेवा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

देवरूख स्कूलमध्ये
छत्र्या वाटप
साडवली ः देवरूख न्यू इंग्लिश स्कूलमधील ५५ पाल्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. एकलमातांच्या पाल्यांना हे वाटप करण्यात आले. देवरूखमधील छत्री व्यापारी आनंद सार्दळ, राजेंद्र राजवाडे, राजू नरोटे आणि मिहिर आर्ते, सुजाता भागवत यांनी या छत्र्या दान केल्या. या सर्वांचे संस्थेकडून आभार मानण्यात आले. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी या माता-भगिनींना पाल्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष नेहा जोशी, मुख्याध्यापक मधुकर कोकणी, सुजाता भागवत, उपमुख्याध्यापक मोघे उपस्थित होते.

संगमेश्वर बाजारपेठेत
रोपेविक्रीला प्रतिसाद
संगमेश्वर ः पावसाळ्यात संगमेश्वर बाजारपेठेत फळझाडे व फुलझाडांची रोपविक्री जोरात सुरू झाली आहे. साग, सोनचाफा, फणस, चिकूसारख्या झाडांची रोपे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी विक्रीस ठेवण्यात आली आहेत. पावसाळा हा झाडे लागवडीसाठी योग्य काळ असल्याने अनेक शेतकरी आणि निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात रोपांची खरेदी करत आहेत. विशेषतः फळझाडे व सजावटी फुलझाडांची मागणी वाढली असून, स्थानिक नर्सरींमधूनही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये आणि आठवडा बाजारात सागवान, चिकू, फणस, सोनचाफा, जास्वंद, गुलाब, सप्तपर्णीसारख्या विविध प्रजातींच्या रोपांची विक्री दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; नाराजी, निधी, तक्रार की आणखी काही प्लॅन?

Konkan Railway Police : मोहम्मदने चॉकलेटमधून गुंगीचे औषध दिलं, पण कोकण रेल्वे कर्मचाऱ्यामुळे अनर्थ टळला

Bhaskargiri Maharaj: गोमातेच्या सेवेत वारीचे पुण्य: भास्करगिरी महाराज; पंढरपुरात काल्याचे कीर्तन

Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये पापाच्या परीचा रिल्ससाठी 'धोकादायक' खेळ... आईनं झिंझ्या धरल्या अन् सपासप ठेवून दिल्या...

Video: आशियातील सर्वात वयस्कर हत्तीणी 'वत्सला'चे 109 व्या वर्षी निधन, काही दिवसांपूर्वींचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT