कोकण

क्राईम

CD

गळफास घेऊन
तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे परराज्यातील तरुणाने राहत्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आली. हिरसिंग मसरसिंग रजपूत (२१, मूळ रा. संचोर, राजस्थान, सध्या रा. वाटदा-खंडाळा, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. रजपूत हा वाटद-खंडाळा येथील अंकूश तांबे यांच्याकडे भाड्याने रहात होता. मंगळवारी सायंकाळी त्याचे मामा तो राहात असलेल्या खोलीवर गेले असता त्यांचा भाचा हिरसिंग रजपूतने खोलीचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या मामांनी दरवाजा जोरात उघडून आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना हिरसिंग हा बेडरूमच्या सिलिंग पंख्याला टॉवेलने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने प्राथमिक आरोग्यकेंद्र वाटद-खंडाळा येथे उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिरसिंगला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli : सांगली अत्याचार प्रकरणाला नवं वळणं, पीडितेच्या बहिणीचा जबाब नोंदवला; धक्कादायक माहिती उघड, घटनेदिवशी रात्री ११ पर्यंत...

Pune Traffic : पावसाळी वाहिनीच्या संथ कामामुळे वाहतूक ठप्प? उपाययोजना करण्याची नागरिकांतून मागणी

Buldhana News: पशुवैद्यकाने भर रस्त्यात स्वतःला पेटविले; उपचारादरम्यान मृत्यू ,निमगाव फाट्यावरील घटना

अमृता प्रेग्नेंट ? ऐश्वर्याचं कारस्थान उघड होणार ! "आता मजा येणार" प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील सारसबागेच्या बाहेरील चौपाटीवर कारवाई

SCROLL FOR NEXT