कोकण

-युनायटेड स्कूलमधील ४७ विद्यार्थ्यांचा गौरव

CD

- ratchl१०१.jpg-
२५N७६६६७
चिपळूण ः गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना डॉ. हसबे.
------
युनायटेड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये पारितोषिक वितरणाचा समारंभ उत्साहात झाला. या निमित्ताने गेल्या वर्षातील शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला २००३ मधील माजी विद्यार्थी आणि चिपळूणमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राकेश हसबे उपस्थित होते.
कार्यक्रमात ४७ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील उल्लेखनीय शैक्षणिक यशासाठी पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक विजेत्यांचे नाव पुकारताच सभागृहात टाळ्यांचा गजर ऐकायला मिळाला. पालक व शिक्षकांचा चेहराही आनंदाने उजळलेला दिसून येत होता. डॉ. हसबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वतःच्या शालेय आठवणी, संघर्षाची कहाणी व वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास या विषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, पर्यवेक्षिका रेवती कारदगे, शिक्षक प्रतिनिधी मोटगी, वैशाली निमकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

SCROLL FOR NEXT