कोकण

देवगड़ दैवज्ञ महिला मंडळातर्फे उद्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

CD

देवगड दैवज्ञ महिला मंडळातर्फे
उद्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

देवगड, ता. ११ : येथील तालुका दैवज्ञ हितवर्धक समाज व देवगड तालुका दैवज्ञ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१३) सातपायरी येथील सभागृहात तालुक्यातील सोनार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांसाठी पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाजाच्या वतीने मागील शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सातवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, दहावी, बारावी उत्तीर्ण, पदवी प्राप्त विद्यार्थी व विशेष प्रावीण्य मिळविलेल्या समाजातील इतर व्यक्ती व विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतिसह महेश घारे किंवा संदीप तळवडेकर यांच्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिक सत्कारामध्ये ज्यांची ६५ वर्षे पूर्ण झाली असतील व या अगोदर सत्कार स्वीकारला नसलेल्या व्यक्तीच सत्कारास पात्र ठरतील. महिलांसाठी पाककला स्पर्धांमध्ये ‘मुग’ या घटकापासून गोड व तिखट पदार्थ बनवावा. यामध्ये प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्या १८ स्पर्धकांना प्रवेश मिळेल. यासाठी दर्शना कुळकर्णी यांच्याशी तसेच अधिक माहितीसाठी नीलरत्न मालंडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष संदीप तळवडेकर व महिला अध्यक्षा दर्शना कुळकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघ

Shubhanshu Shukla : अवकाशात तुम्ही पाणी खावू शकता! कसे जेवतात अंतराळवीर? शुभांशू शुक्लांनी शेअर केला भन्नाट व्हिडिओ

Crime News : भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरी छळ, आंघोळीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न; विरोध करताच सासऱ्याची भररस्त्यात दांडक्याने मारहाण

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसींच्‍या आरक्षणातून जागा देण्यास तीव्र विरोध; 58 लाख कुणबी दाखले रद्द करण्याची मागणी

Latest Marathi News Updates : श्रेय दुसऱ्या कोणाचं नाही तर गरीब मराठांच आहे - मनोज जरंगे

SCROLL FOR NEXT