76866
वैभववाडी रोटरी क्लबच्या
अध्यक्षपदी सचिन रावराणे
वैभववाडी, ता. ११ ः येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सचिन रावराणे यांची निवड झाली असून सचिवपदी डॉ. नामदेव गवळी तर खजिनदारपदी सौ. स्नेहल रावराणे यांची निवड झाली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी (ता.१३) सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी सभागृहात होणार आहे.
येथील रोटरी क्लबच्या कार्यकारणीची मुदत ३० जूनला संपली. त्यानंतर २०२५-२६ करीता नवीन कार्यकारिणी करण्यात आली. या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा १३ ला होणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांना पदभार विक्रांतसिंह कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मावळते अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमात आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गजानन कोलते यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निहाल रावराणे आणि आर्य मोरे या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष रावराणे यांनी दिली. रोटरी क्लबच्या माध्यमातुन वर्षभरात पाच रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. ४ आरोग्य शिबीरात १२०० जणांची तपासणी केली. ४२ मोतीबिंदु शस्त्रक्रिया केल्या आहेत.