कोकण

आजचा सत्कार जिद्दीचा, कष्टाचा

CD

-rat११p६.jpg-
P२५N७६८०६
रत्नागिरी : संकल्प कलामंचतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गुरूगौरव सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. सत्कारमूर्तींसह मान्यवर.
--------
गुरू हा अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो
डॉ. कल्पना मेहता ः संकल्प कलामंचतर्फे गुरुंचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : आजचा कार्यक्रम अविस्मरणीय आहे. कारण, सत्कार झालाय तो जिद्दीचा, कष्टाचा, दुःखावर विजय मिळवल्याचा. त्यामुळे आज गहिवरून आलं आहे. गुरू आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो. आजचे सत्कारमूर्ती गुरुतुल्य आहेत, असे प्रतिपादन डॉ. कल्पना मेहता यांनी केले.
संकल्प कलामंचतर्फे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूंच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. मारुती मंदिर येथील महिला मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेला सायंकाळी झाला. हा कार्यक्रम फक्त सत्कार नव्हे तर संकल्प कलामंचने केलेले सत्कर्म आहे. यातून समाजात जागरूकता निर्माण करत आहेत, प्रेरणा देत आहेत, असेही डॉ. मेहता यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक धर्मेंद्र सावंत यांनी सांगितले की, आज मराठी माणसांनी एकत्र येण्याची गरज आहे तरच प्रगती आहे. कारण, आज एकट्याने उद्योग करायचे दिवस राहिले नाहीत. प्रमुख पाहुणे डॉ. शाश्वत शेरे म्हणाले, गुरुपद कधीही संपत नाही, तो वारसा पुढे पुढे जात असतो. माणसाने कायम विद्यार्थी राहावे. आयुष्यभर आपण कोणा ना कोणाकडून शिकत राहतो. यावेळी संकल्प कलामंचचे अध्यक्ष विनयराज उपरकर, डॉ. दिलीप पाखरे, सल्लागार विनोद वायंगणकर आदी उपस्थित होते.

चौकट
यांचा झाला सन्मान
रिद्धी चव्हाण, तन्वी मोरे, विकास साखळकर, स्वरा साखळकर, हिमोफिलिया सोसायटी रत्नागिरी शाखा (विजय शिंदे), मनोज लेले, दुर्गेश आखाडे व विनोद कदम, राजेंद्र सावंत, वैशाली खाडीलकर, राज कांबळे, सोमेश्वर शांतीपिठ (राजेश आयरे), महेश बने, स्मिता साळवी, नेत्रा राजेशिर्के, स्वप्नजा मोहिते, वृषाली टाकळे, डॉ. शाश्वत शेरे, मुकुंद शेवडे, ओंकार रहाटे, रूपेश पेडणेकर, विनायक खानविलकर, अमरिश पवार, रक्षिता पालव, कोमल सोनावणे, अभिषेक पाटील, विनोद वायंगणकर, इशान कासेकर, स्वरदा कांबळे, साहिल तांबट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : दरवर्षी सारखी जुहू चौपाटीवर गर्दी नाही

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT