कोकण

‘परख’मध्ये सिंधुदुर्ग राज्यात द्वितीय

CD

‘परख’मध्ये सिंधुदुर्ग राज्यात द्वितीय

शैक्षणिक गुणवत्तेची छाप; राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेतर्फे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या परख या राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तिसरी, सहावी आणि नववीमध्ये भाषा, गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र या विषयांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेची ठसठशीत छाप पाडली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत प्रतिवर्षी परख (परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अँनालिसेस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट) याबाबत सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षी ३ री, ६ वी व ९ वीसाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. याचा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात द्वितीय ठरला आहे. राज्य पातळीवर कोल्हापूर जिल्ह्याने पहिले स्थान मिळवले असले तरी, सिंधुदुर्गने सर्व इयत्तांमध्ये सातत्यपूर्ण व सरस कामगिरी करून दुसरे स्थान पटकावले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सिंधुदुर्गमधील विद्यार्थ्यांची सखोल शैक्षणिक समज, लेखन-वाचन कौशल्ये आणि संख्यात्मक विश्लेषण या बाबतीत प्रगती जास्त दिसून आली आहे.
महाराष्ट्रातील ४ हजार ३१४ शाळांमधील १ लाख २३ हजार ६५९ विद्यार्थ्यांचा सहभाग या सर्वेक्षणात होता. ३ री, ६ वी व ९ वी या तीन टप्प्यांमध्ये भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र व परिसर अभ्यास या विषयांवर आधारित मूल्यांकन परख (परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अँनालिसेस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट) हे राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, शाळांमधील अभ्यासक्रम अंमलबजावणीची गुणवत्ता, आणि शैक्षणिक प्रशासकीय पातळीवर वेळोवेळी घेतलेले निरीक्षण व मार्गदर्शन याचा परिपाक म्हणून ही कामगिरी उभारता आली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विशेष उपक्रम राबवले गेले.
----------
शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही घवघवीत कामगिरी इतर ग्रामीण व आदिवासी भागातील जिल्ह्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. भविष्यात या कामगिरीच्या आधारे अधिक संशोधन, शिक्षक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम केंद्रित धोरण आखण्याची शक्यता शिक्षण खात्याने व्यक्त केली आहे.
----------
कोट
‘परख’ राष्ट्रीय सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवलेले दुसरे स्थान हे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय यंत्रणेसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. हे यश हे केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून आपल्या जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदमार्फत आम्ही शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व पालक सहभाग यावर विशेष भर दिला आहे. याचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. शिक्षकांचा समर्पित दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आत्मभानाची भावना यामुळेच सिंधुदुर्गने ही घोडदौड जिंकली आहे. या यशाच्या जोरावर आम्ही पुढील काळात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये अधिक दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
- रवींद्र खेबूडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
------------
सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर उंच भरारी घेतली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘परख’ राष्ट्रीय सर्वेक्षणात मिळालेल्या यशामागे डाएट प्राचार्य, सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा सामूहिक प्रयत्न आहे. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण अध्यापन, सतत पाठपुरावा, शिक्षकांचे नियमित प्रशिक्षण आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे वातावरण आम्ही सातत्याने निर्माण करत आलो आहोत. विद्यार्थ्यांनी तिसरी, सहावी आणि नववीमध्ये विषयानुसार केलेली कामगिरी हे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचे निदर्शक आहे. यामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांचाही मोठा वाटा आहे. ही कामगिरी केवळ पुरस्कारासाठी नाही, तर सर्वांगीण विकासासाठी आम्हाला प्रेरणा देणारी ठरेल. आगामी काळात अजून दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहोत.
- डॉ. गणपती कमळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
-------------
इयत्ता व विषयानुसार जिल्ह्याची कामगिरी (सरासरी)
इयत्ता*विषय*सरासरी
तिसरी*भाषा*८१
****गणित*७६
-------------
सहावी*भाषा*७३
****गणित*५९
****परिसर अभ्यास*६४
-------------
नववी*भाषा*७४
****गणित*४३
****विज्ञान*४७
****सामाजिक शास्त्र*४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT