76909
बांदा केंद्रशाळेची दुर्वा नाटेकर
शिष्यवृत्तीत जिल्ह्यात प्रथम
बांदा, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पीएम श्री बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थीनी दुर्वा नाटेकर हिने २७२ गुण प्राप्त करून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या या परीक्षेमध्ये बांदा केंद्र शाळेतील दुर्वा नाटेकरबरोबर स्वरा दीपक बांदेकर व तन्वी यशवंत साईल या दोन्ही विद्यार्थिनींनी जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तसेच शाळेतील विद्यार्थी स्वामिनी तर्पे, अंकीता झोळ,आफरीन शहा, अवनिश कुबडे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सदस्या रूपाली शिरसाट, मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी अभिनंदन केले. वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रंगनाथ परब जे. डी. पाटील, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे, कृपा कांबळे, प्रसन्न जित, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कळमकर, गटशिक्षणाधिकारी परब, विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर यांनी शाळेचे अभिनंदन केले. पीएम श्री बांदा नं. १ केंद्रशाळेतील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जे. डी. पाटील यांनी बांदा केंद्र शाळेतील पाचवीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर २६८ गुण मिळवले तर २५०० रूपये (यापूर्वी विद्यार्थीनी कनिष्का केणी हिने २६६गुण मिळवलेत) व पुढील दोन गुणांसाठी २०० रूपये या प्रमाणे विद्यार्थ्यांना बक्षीस पुरस्कृत केले आहे. चालू वर्षी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७२ गुण मिळविल्याबद्दल अंतिम निकाल जाहीर झालेल्या दिवशी रोख २९०० रूपयांचे बक्षीस देऊन दुर्वाला सन्मानित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.