कोकण

चिपळूण ःपरमिटरूम, बार संघटनेचा सोमवारी राज्यव्यापी बंद

CD

परमिटरूम, बार संघटनेचा
सोमवारी राज्यव्यापी बंद

चिपळूण, ता. १२ ः राज्य शासनाच्या दारूविक्रीवरील करवाढ धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम, बार व हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारी (ता. १४) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. मद्यावरील व्हॅटमध्ये दुप्पट, परवाना शुल्कात १५ टक्के, तर उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाल्याने संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. याच पार्श्वभूमीवर आहार संघटना मुंबई, तसेच राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या पुढाकाराने हा बंद पुकारल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज यांनी दिली.
या बंदला चिपळूण तालुका रमिट रूम, बार, पहॉटेल असोसिएशनने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक सोमवारी सकाळी ११ ते ५ दरम्यान व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत संघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज, उपाध्यक्ष सुहास चव्हाण, सचिव प्रथमेश कापडी व खजिनदार मिलिंद गोंधळी यांनी संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली. शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: 'मराठा आरक्षणासाठी सायकलवरून तब्बल 720 किलोमीटरचे अंतर पार करत गाठली मुंबई; संदीप गव्हाणे-पाटील यांची परभणी ते मुंबई सायकल वारी

Crime News : दिंडोरी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या कारवाईवरच संशय

Heavy Rain: कारंजा, दिग्रसला वादळी पावसाने झोडपले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, वीजपुरवठा खंडित, वाहतूकही ठप्प

PCMC Cyber Fraud : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ६९ लाखांची फसवणूक; दोन आरोपी अटकेत

Akola News: उमा बॅरेज प्रकल्पात नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार; सहायक अभियंत्याच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT