कोकण

‘श्री’ लागवडीने भात उत्पन्नात वाढ

CD

77215


‘श्री’ लागवडीने भात उत्पन्नात वाढ

डॉ. विजय पालसांडे; गोळवण शिसेगाळुवाडीत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ ः ‘श्री’ भात पीक लागवड पद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, असे प्रतिपादन मुळदे येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय पालसांडे यांनी गोळवण येथे केले.
गोळवण शिसेगाळुवाडी येथील आबा चव्हाण यांच्या घरी ‘श्री’ पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, कट्टा गावचे प्रगतशील शेतकरी आनंद रावले, उपकृषी अधिकारी डी. के. सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता चिरमुले, पीक विमा समन्वयक श्री. माईणकर, प्रकल्प सहयोगी आशिष जाधव, कृषी सेवक नीतेश पाताडे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गोळवण, कुमामे, डिकवल येथील १०० शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. डॉ. पालसांडे यांनी ‘जिओआय’, ‘यूएनडीपी’, ‘जीसीएफ’, ‘इसीआरआयसीसी’अंतर्गत ‘श्री’ भात पीक लागवडीबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करताना या पद्धतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकरी संपन्न होईल, असे सांगितले. आनंद रावले यांनी स्वअनुभवातून करत असलेल्या ‘श्री’ भात पीक पद्धतीचे लाभ उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमाला गोळवण, कुमामे, डिकवलमधील प्रगतशील शेतकरी सत्यविजय पालव, नंदादीप नाईक, नामदेव परब, नामदेव चव्हाण, नारायण परब, सुहास घाडी, दीपश्री आंगचेकर, सागरिका लाड, उत्तम पाताडे, संतोष चव्हाण, मिलिंद लोहार, गुरुनाथ पालव, मनोहर परब दिवाकर परुळेकर आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कृषी सेवक नीतेश पाताडे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष लाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cafe Goodluck News : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अन् पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला टाळे, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा भाजपशी संबंध नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Bacchu Kaduc: कडू यांनी पदयात्रेत डोळ्यावर बांधली पट्टी; सातबारा कोरा पदयात्रा, दिव्यांगांनी घेतला सहभाग

Ichalkaranji Crime : इचलकरंजीत ‘मिशन झीरो ड्रग्ज’, नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; पण मुख्य सूत्रधार पळाला

माेठी बातमी! पटसंख्या घटलेल्या शाळांची आता गुणवत्ता पडताळणी; अधिकाऱ्यांची पथके देणार भेटी, शिक्षकांवर कारवाई हाेणार

SCROLL FOR NEXT