कोकण

चिपळूण-मुंबई विद्यापिठाच्या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव

CD

मुंबई विद्यापिठाच्या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव
विद्यार्थिनींच्या तक्रारीची दखल; उच्चस्तरीय आमदार समिती गठित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ः मुंबई विद्यापिठाच्या नवीन मुलींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याचा अभाव, गळकी टाकी, अस्वच्छतागृहे, तुटलेली पाइपलाइन, वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्चस्तरीय आमदार समिती गठित केली आहे. या पाहणी समितीत आमदार शेखर निकम यांची निवड केली आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार मेघना, साकोरे बोर्डीकर यांनी प्रश्न उपस्थित करत परिस्थितीची सखोल चौकशी करावी व सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ही समिती जाहीर करण्यात आली. या समितीमध्ये विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर (अध्यक्ष), अनील परब, निरंजन डावखरे, नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे तसेच विधानसभेचे सदस्य सुनील प्रभू, मंगेश कुडाळकर, शेखर निकम यांचा समावेश आहे. तसेच उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक हे समन्वयक व सदस्य सचिव म्हणून कार्य पाहतील. ही समिती वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना सुचवणार असून, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून सविस्तर अहवाल शासनास सादर करणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, सुसज्ज व सुविधायुक्त निवास व्यवस्था निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा भाजपशी संबंध नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Heart Health: अतिरिक्त मीठ सेवनाने विकारांचा वाढता धोका; उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकारांची जोखीम

Home Remedy For Cold: बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय? मग आजीच्या 'या' देसी काढ्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल

Marathwada Rain: मराठवाड्यात घटले पावसाचे दिवस; गेल्यावर्षी २९, यंदा सोळाच दिवस

पत्नी प्रियकरासोबत पळून जायची, घटस्फोट मिळताच तरुणानं केली दुधानं अंघोळ; म्हणाला, मी स्वतंत्र झालो, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT