कोकण

रत्नागिरी-शून्य कामगिरी करणाऱ्या बॅंकांमधून शासकीय खाती बंद करा

CD

rat13p3.jpg-
77199
रत्नागिरीः जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना पालकमंत्री उदय सामंत.
----------
शून्य कामगिरीची शासकीय खाती बंद करा
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत ; ‘सीएमईजीपी’साठी प्रत्येक बँकेत स्वतंत्र कक्ष करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी प्रत्येक बँकेने सोमवार आणि गुरुवारी स्वतंत्र कक्ष सुरु करुन, त्यामधून प्रकरणे मार्गी लावावीत. ज्या बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. परंतु, शून्य कामगिरी करणाऱ्या बँकांमधील असणारी शासकीय खाती बंद करावीत. भारतीय रिझर्व्ह बँकेला त्यांच्या कामगिरीबाबत पत्र पाठवावे. ज्या बँकांनी हेलपाटे मारायला लावून प्रकरणे नामंजूर केली आहेत, अशांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उद्योगमंत्री सामंत यांनी आज बैठक घेऊन सीएमईजीपी योजनेविषयी आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) विजयसिंह जाधव, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा व्यवस्थापक अय्याज पिरजादे आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, ज्या बँकांनी सीएमईजीपी योजनेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. त्यांचे मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. ज्या बँकांनी एकही प्रकरण केलेले नाही, अशांच्या कामगिरीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेला कळवावे. पीक कर्जाबाबत अजूनही काही बँका सिबील स्कोअर बघतात. त्या बँकांवर कारवाई करा. अग्रणी बँकेने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सर्व बँकांची बैठक घेऊन आढावा घ्यावी. बँकांनी विनाकारण कर्ज प्रकरणांसाठी हेलपाटे मारायला लावू नयेत. आपल्या कामगिरीत वेळेत सुधारणा करावी. उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर एखादे प्रकरण आले असेल, तर ते पुढील वर्षासाठी घ्यावे, त्यासाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रे मागू नयेत. वॉटरस्पोर्टसाठी जिल्हा उद्योग केंद्राने प्रस्ताव द्यावा. त्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत मर्यादा ठेवली जाईल, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT