कोकण

‘फुगडी, फाग, घुमट वादन, राधानृत्य कलेची दखल घ्या’

CD

77384

‘फुगडी, फाग, घुमट वादन,
राधानृत्य कलेची दखल घ्या’

मानधन योजनेत समावेशाची मागणी

कणकवली, ता. १५ ः राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचनालयामार्फत कलाकारांना दिल्या जाणाऱ्या मानधन योजनेत कोकणातील महिलांची पारंपरिक फुगडी आणि होलिकोत्सव सणातील फाग, घुमट वादन, राधा नृत्य कलांचा समावेश करून कलाकारांना मानधन देण्याची तरतूद शासन निर्णयात करावी, अशी मागणी लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे राज्य शासनाकडे केली आहे.
लावण्यसिंधू लोककला आणि चित्रपट सहकारी संस्थेची कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच कणकवली येथील भवानी सभागृह येथे झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, उपाध्यक्षा अक्षता कांबळी, सचिव नितीन तळेकर, खजिनदार रविकिरण शिरवलकर, प्रांजल पराडकर, राजन तावडे, संतोष सावंत, गिरीश उपरकर आदी उपस्थित होते. शासनामार्फत गोंधळी, लोककलावंत, वादक, लावणी नृत्य कलाकार, दशावतारी नाट्य कलाकार, कीर्तनकार आदी कलाकारांना आणि कला पथकांना विविध योजनाद्वारे दरवर्षी मानधन दिले जाते. मात्र, अशा योजनांमध्ये कोकणातील महिलांच्या परंपरिक फुगडी आणि होळी सणातील फाग, घुमट वादन व राधा नृत्य अशा कलांचा समावेश शासन निर्णयात नसल्याने या कलांची जोपासना करणाऱ्या वृद्ध कलाकारांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. कोकणातील विविध सांस्कृतिक मंडळानींही या मागणीचा पाठपुरावा करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jarange and Vikhe Patil: उपोषण सोडण्याची घोषणा करण्याआधी जरांगेंनी विखेंना नेमके कोणते प्रश्न विचारले?

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; भावूक होत म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीनेही उत्तम काम केले - एकनाथ शिंदे

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

Maratha Reservation : मराठा-मुस्लीम एकतेचे दर्शन; आंदोलकांसाठी आडूळ गावातून पाठवले खाद्यपदार्थ

SCROLL FOR NEXT