कोकण

दृष्टीबाधित आदेशचे केले व्यावसायिक पुर्नवसन

CD

दृष्टीबाधित ‘आदेश’चे व्यावसायिक पुनर्वसन
नॅबचा पुढाकार ; मसाजसाठीचे साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : लांजा येथील दृष्टीबाधित झालेल्या आदेश खंदारे यांचे नॅबने व्यावसायिक पुनर्वसन करून व्यावसायिक दृष्टी प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे आदेश स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे.
लांजा तालुक्यातील बोरवले गावचे आदेश खंदारे हे शंभर टक्के अंध आहेत. त्यांनी गेल्या वर्षी नॅब संस्थेच्या माध्यमातून स्वयंसिद्धता व मसाज प्रशिक्षण पूर्ण केले. त्या माध्यमातून आपल्या गावाच्या जवळपास नागरिकांना मसाज सेवा देण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे नॅब संस्थेच्या माध्यमातून त्याला मसाजरचे आवश्यक साहित्य दिले गेले. हे साहित्य वितरित करताना नॅब अध्यक्ष सुचय अण्णा रेडीज म्हणाले, कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आपले अंध बांधव मसाज करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. आम्ही त्यांना त्यांच्या व्यवसायाला बळ देण्यासाठी मदत करत आहोत. संस्थेच्या माध्यमातून अंत्रवली येथील बाळू मोहिते, विल्ये येथील प्रगती तावडे, कोंडआंबव येथील गोविंद पांचाळ, लोटे येथील राकेश चाळके, चिपळूण येथील सूरज राठोड हे सर्व १०० टक्के दृष्टीबाधित असून, रुणांना तसेच लोकांना मसाज सेवा देत आहेत. या प्रसंगी खंदारे यांना अध्यक्ष सुचय रेडीज, कार्यवाह नीलेश भुरण, ॲड. विवेक रेळेकर, सलीम पालोजी, सतीश वीरकर, प्रकाश पाथरे, भरत नांदगावकर यांच्या उपस्थितीत कास्य थाळी मसाजर देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी विकास अधिकारी संदीप नलावडे आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'एकतर्फी प्रेम चालणार नाही' म्हणत ओवैसींनी बिहार निवडणुकीसाठी ठोकला शड्डू; स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा!

Mahayuti: ड्रग्ज व्यापार रोखण्यासाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय! आरोपींना होणार कठोर शिक्षा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ENG-U19 vs IND-U19: वैभव सूर्यवंशी गोलंदाजीत चमकला, धडाधड घेतल्या इंग्लंडच्या विकेट्स; रचला इतिहास, भारताची मजबूत पकड

Latest Marathi News Live Updates : दीपक काटेवर 307 चा गुन्हा दाखल करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी

MLA Bhimrao Tapkir : झाडण कामाच्या निविदेचा खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करा; ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता घोटाळा

SCROLL FOR NEXT