कोकण

विद्यार्थ्यांना आपत्कालीन सुरक्षेचे धडे

CD

swt141.jpg
77411
खारेपाटणः महाविद्यालयात आपत्तीपूर्व प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखविताना एनडीआरएफची टीम. (छायाचित्र ः एन. पावसकर)

विद्यार्थ्यांना आपत्कालीन सुरक्षेचे धडे
खारेपाटणमध्ये उपक्रमः एनडीआरएफच्या जवानांकडून मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ : खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एनसीसी व विद्यार्थी कल्याण समिती यांच्यावतीने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) च्या जवानांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख राजश्री सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांनी आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाची सुरुवात केली. छत्रपती खांदवे यांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
या प्रशिक्षणात ए.एस.आय. विजय म्हसके, दुर्वेश कुमार, हवालदार प्रदीप पाटील, हवालदार झेंडे, हवालदार फापले, हवालदार उज्ज्वला फडतरे, कॉन्स्टेबल अजहर सय्यद, गौरेश थवकर, श्रीणू बाबू, प्रीती कुमारी यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अजय गुरसाळे, माजी सरपंच रमाकांत राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गावातील नागरिकांनी आणि विद्यार्थी वर्गाने कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात केल्या. विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक उपचार, बचाव कार्य, सुरक्षित स्थळी स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना, जलतरण सहाय्य, इमारतींच्या दुर्घटना यासंबंधीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक एनडीआरएफ पथकाने सादर केले. महाविद्यालयाच्या वतीने सहभागी जवानांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळातील सजगता, तत्परता व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रम अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक वसीम सय्यद यांनी, पाहुण्यांची ओळख रश्मी देसाई यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रणय माने यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT