swt1420.jpg
77467
नापणे ः येथील धबधब्यावर उभारलेल्या काचेच्या पुलाची पाहणी करताना तहसिलदार सुर्यकांत पाटील, उपअभियंता विनायक जोशी, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आदी.
नापणे धबधब्यावर सुरक्षा उपाय योजा
वैभववाडी तहसिलदारांच्या सूचना ः गर्दीच्या पार्श्वभूमीवर काचेच्या पुलाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ ः नापणे धबधब्यावर उभारलेल्या काचेच्या पुलामुळे तेथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे तेथे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना करा, अशा सुचना तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी बैठकीत केली.
सिंधुरत्न योजनेतून ९९ लाख ६३ हजार रूपये खर्चून नापणे धबधब्यावर काचेचा पुल उभारण्यात आला आहे. अशा पध्दतीने हे उभारलेले हे राज्यातील पहिले पुल आहे. या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र, काचेचा पुल उभारल्यामुळे या पर्यटनास्थळावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे तहसिलदार पाटील यांनी नापणे धबधब्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, शाखा अभियंता शुभम दुडये, सरपंच प्रदीप जैतापकर आदी उपस्थित होते. त्यानंतर तहसिलदारांनी त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बांधकाम आणि ग्रामपंचायतीला सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण सुचना केल्या. धबधबा परिसरात खबरदारीचे फलक लावण्यासोबत सुचना केल्या. यावेळी बांधकामचे श्री. जोशी यांनी काचेच्या पुलावर एकावेळी २५ पर्यटकांनी आनंद घ्यावा. गर्दीच्या वेळी १५ ते वीस मिनिटेच पुलावर थांबावे, पुलावरून चालताना सावकाश चालावे, रेलिंगचा आधार घेवून उभे राहावे, पुलावर बसून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये, काचेला धोका होईल असे कोणतेही अवजड वस्तू पुलावर नेऊ नयेत, पुलावर उड्या मारणे, लोंबकळणे टाळावे, परिसर स्वच्छ ठेवावा अशा आशयाचे फलक लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, तहसिलदार पाटील यांनी पोलीसांना देखील वाहतुक, पार्किंगच्या दृष्टीने सुचना केल्या. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून काही उपाययोजना कराव्यात याबाबत देखील चर्चा झाली.
चौकट
लहान धबधब्यानजीक रेलिंगबाबत चर्चा
नापणेच्या मुख्य धबधब्याचा डोह ४० ते ४५ फूट खोलीचा आहे. त्यामुळे तेथे जाणे धोकादायक आहे. अधिकत्तर पर्यटक लहान धबधब्यावरच आनंद घेतात. तेथेच एक डोह आहे. तेथे पोहतात. काही वेळा पाण्याचे प्रवाह अधिक असतो. त्यामुळे पर्यटक वाहून जाण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी रेलिंग केल्यास वाहून जाणाऱ्यास तो आधार ठरू शकेल. त्यामुळे तेथे रेलिंग करावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.