कोकण

नाम जप संकल्प वह्या अक्कलकोट मठास सुपूर्द

CD

swt153.jpg
77680
अक्कलकोटः येथील वटवृक्ष देवस्थान कार्यालयात नंदकुमार पेडणेकर, अशोक गुराम यांना सन्मानित करताना देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे व अन्य.

नाम जप संकल्प वह्या
अक्कलकोट मठास सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १५ः स्वामी समर्थांचे भक्तीचे कार्य पुढे नेण्याचे काम कौतुकास्पद आहे. नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. नवीन भक्त निवास, दर्शन रांग तसेच श्रीकृष्ण मंदिर यांच्या पायाभरणीमध्ये या लिखित जपाचा निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी अक्कलकोट येथे केले.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड आणि श्री दत्त स्वामी सेवा केंद्र स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर आरे कॉलनी गोरेगाव यांच्या वतीने एक कोटी नामजपाचा संकल्प गुरुपौर्णिमेनिमित्त करण्यात आला. या नामजपाच्या वह्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर तसेच वटवृक्ष मंदिर येथे सुपूर्द करण्यात आल्या. नामजप संकल्प वह्या अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ समाधी मठात स्वामीभक्तांसाठी ठेवण्यात आल्या. एक कोटी जपाची पूजा चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री अन्नुमहाराज यांनी केली. जप वह्या पालखीतून श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथे वाजतगाजत नेण्यात आल्या.
श्री. इंगळे यांनी सर्व पालखीधारकांचा सत्कार केला. हडपीड मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर, श्री दत्त स्वामी सेवा केंद्र गोरेगाव मठाचे मठाधीश अशोक गुराम, नितीन म्हापसेकर, सचिन लोके, अनंत जंगम, मारुती जंगम, प्रकाश जोईल, मधुसुदन भडसाळे, श्री. राणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali: ''आपण हास्यजत्रेच्या निवेदिका आहात, परंतु...'', मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या प्राजक्ता माळीला ठाकरे गटाचा टोमणा

Success Story: हवेली तालुक्यातील हर्षद शिंदेंचे एव्हिएशन क्षेत्रात यश; अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश, देशातील केवळ ११ यशस्वी उमेदवारांमध्ये निवड!

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख नारायणगाव केसरीचा मानकरी, विजेत्या पैलवानांना 15 लाखाचा इनाम, भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट!

Summer Roof Cooling Tips: बाहेर कमी घरातच उन्हाचे चटके बसतायत? मग छताची उष्णता कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' स्मार्ट जुगाड

New Scam : मोबाईल वापरताना छोटीशी चूक! अकाऊंट मधले पैसे हळूहळू होतील गायब; पटकन बदलून घ्या एक सेटिंग अन् डायल करा 'हा' नंबर

SCROLL FOR NEXT