कोकण

महिलांसाठी पर्यटन करिअर संधीवर मोफत सेमिनार

CD

पर्यटन करिअर संधीवर मोफत चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि कोकणातील पर्यटनक्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने पर्यटनातील करिअर- दिशा आणि संधी या विषयावर मोफत चर्चासत्र होणार आहे. याचे आयोजन महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने केले आहे.
सोमवारी (ता. २१) दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात हॉटेल विवा एक्सिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होणार आहे. महिलांसाठी पर्यटनक्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, आवश्यक कौशल्ये, कोकणातील पर्यटन उद्योगाचा विस्तार आणि पुढील काळात पर्यटनात उदयास येणाऱ्या करिअरच्या दिशा याबाबत तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र होणार असून, सहभागी होणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. सेमिनारसाठी प्रवेश विनामूल्य असून, मात्र पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
कोकणात पर्यटनासाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. विमानतळ, हॉटेल्स, ट्रॅव्हल कंपन्या या ठिकाणी नोकरीच्या संधी, टुरगाईड, टूर को-ऑर्डिनेटर, फ्रंटऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा संधी मिळतील. यासाठी संपूर्ण कोकणातील महिलांसाठी एक नवी दिशा देणारा हे सेमिनार असणार आहे. विविध विषयांवरील चर्चासत्र झाल्यानंतर बाया कर्वे इन्स्टिट्यूटतर्फे १२वीनंतर कोणत्याही शाखेतील महिलांसाठी एक वर्षाचा अर्धवेळेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या चर्चासत्रासाठी महिला, मुली व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाया कर्वे इन्स्टिट्यूट स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्य व प्राचीन कोकणच्या संचालिका स्वरूपा सरदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT