कोकण

ठाकरे शिवसेनेतर्फे लांजात गणेशमूर्ती निर्मितीची स्पर्धा

CD

लांज्यात गणेशमूर्ती निर्मितीची स्पर्धा
ठाकरे शिवसेनेतर्फे आयोजन ; विजेत्यांचा होणार सन्मान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १५ ः उद्धव बाळासाहेब ठाकरे लांजा तालुका पक्षाच्यावतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची स्पर्धा २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहेत. लहान गट पाचवी ते सातवी आणि मोठ्या गटात आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकासाठी रोख रक्कम, प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ म्हणून प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी मूर्तीची उंची ६ ते ८ इंच असणार आहे. स्पर्धकांना शाडू माती गोळा पुरवण्यात येईल. इतर आवश्यक साधने स्वत: आणावयाची आहेत. स्पर्धेची वेळ सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत असणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धा पक्षाच्या संपर्क कार्यालयात घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक समारंभ सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत होईल. इच्छुक स्पर्धकांनी २० जुलैपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख सुरेश करंबेळे, विजय बेर्डे, प्रकाश हर्चेकर, मंगेश मुळे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shami vs Agarkar : मी त्याचं उत्तर देईन...! अजित आगरकरने मोहम्मद शमीच्या टीकेला दिले उत्तर; म्हणाला, बघतो आता कसा...

Dr. Apoorva Hiray : ‘गुन्हे खोटे, राजकीय द्वेषातून’! १७ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपांवर डॉ. अपूर्व हिरे यांचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: इचलकरंजीत विदयार्थ्यांकडून पर्यावरणपूरक दिवाळी साहित्य निर्मिती

Post Office Service: आता पोस्टानं पाठवलेलं पत्र किंवा पार्सल लवकर पोहोचणार; पोस्ट ऑफिस नवीन सेवा सुरू करणार, अंमलजावणी कधी?

Kolhapur Crime: कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा जीव देण्याचा प्रयत्न, हाताच्या नसा कापून घेतल्या; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT