कोकण

मालवणात विद्यमानांना धक्का

CD

77719

सरपंच आरक्षण बदलल्यामुळे
मालवणात विद्यमानांना धक्का

६५ पैकी ३२ जागा महिला आरक्षित

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत झाली. यात ३२ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. दरम्यान, अनेक गावांमधील सरपंच पदाची आरक्षणे बदलल्याने काही विद्यमानांना धक्का बसला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या यावेळी वाढण्याची शक्यता आहे.

तालुका स्कूल येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक बागवे, आनंद तोंडवळकर आदी उपस्थित होते. ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे तळगाव, बांदिवडे बुद्रुक त्रिंबक, महिला-गोळवण राठीवडे, अनुसूचित जमाती महिला-वराड, नागरिकांचा मागास प्रवर्ग आंबडोस, बांदिवडे खुर्द कोईल, देवबाग, काळसे, खोटले, मिर्याबांदा सर्जेकोट, गोठणे, हेदुळ, चौके, महिला-वायंगवडे, मसदे चुनवरे, वेरळ, पेंडूर खरारे, तिरवडे, कोळंब, वायरी भूतनाथ, पोईप, नांदरुख.
खुला प्रवर्ग तोंडवळी, बिळवस, हडी, महान, शिरवंडे, साळेल, आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ, चाफेखोल, मठबुद्रुक, किर्लोस, वरची गुरामवाडी, चिंदर, माळगाव, आडवली मालडी, देऊळवाडा, पळसंब, तारकर्ली काळेथर, आचरा, घुमडे, वायंगणी, नांदोस, महिला-वडाचापाट, मर्ढे, बुधवळे कुडोपी, असगणी, आंबेरी, हिवाळे, रेवंडी, ओवळीये, देवली, मालोंड, रामगड, असरोंडी, धामापूर, श्रावण, कुंभारमाठ, कांदळगाव, कातवड, निरोम, कुणकवळे, सुकळवाड अशी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

Leopard Attack:'पारनेर तालुक्यात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हाल्ल्यात दोघांचा मृत्यू'; तीन वर्षीय बालकावर हल्ला

Latest Marathi News Updates: डोंबिवलीतील पलावा परिसरात बिर्याणीच्या दुकानाला भीषण आग

Chandwad Accident : चांदवडच्या राहूड घाटात भारत गॅसचा टँकर पलटी; मोठी गॅस गळती सुरू

SCROLL FOR NEXT