कोकण

कोकण रेल्वे संघर्ष समितीतर्फे आंदोलनाचा इशारा

CD

77755
सिंधुदुर्गनगरी ः येथे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.


मडूरे ते दादर रेल्वे सुरू करा

कोकण रेल्वे संघर्ष समिती; सावंतवाडी-दादर गाडीचीही मागणी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ः सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख रेल्वेस्थानक आहे. या स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या गणेशोत्सव कालावधीत मडूरे ते दादर व सावंतवाडी ते दादर अशा दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऑगस्टला सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा या सर्व दहा रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि जिल्ह्यामध्ये न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकासह विविध रेल्वेस्थानकांवर कायमस्वरूपी थांबा मिळावा, यासाठी संघटनेमार्फत मागील तीन वर्षापासून मागणी केली जात आहे. यासाठी विविध लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला तसेच उपोषण करून लक्ष वेधण्यात आले तरीही अद्याप मागण्याची पूर्तता झालेली नाही. २७ ऑगस्ट २०२५ पासून कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकही गाडीची बुकिंग शिल्लक राहिलेली नाही. तरी गणेशोत्सवासाठी २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधी मडुरे ते दादर व सावंतवाडी ते दादर अशा दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून दोन्ही गाड्या कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात.
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकासह वैभववाडी व नांदगाव रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडकीची सुविधा तात्काळ सुरू करावी. जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख रेल्वेस्थानक असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर लांब पल्ल्याच्या किमान पंधरा गाड्यांना थांबा मिळावा, सावंतवाडी रेल्वेस्थानकाचे सावंतवाडी टर्मिनस असे नामकरण करावे, सिंधुदुर्गातील सर्व रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन तात्काळ सुरू कराव्यात, प्लॅटफॉर्म सुविधा नसलेल्या सर्व रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म सुविधा निर्माण करावी अशा विविध मागण्या या निवेदनातून केले आहेत.
---
...तर एक आॅगस्टला आंदोलन!
या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्यावतीने १ ऑगस्टला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्रवासी, नागरिक, लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष परशुराम परब, शुभम परब, स्वप्निल गावडे, अॅड. नंदन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT