कोकण

वरवडे विद्यालयात देणगीदार कद्रेकर भगिनींचा सत्कार

CD

-rat१५p१६.jpg-
२५N७७६१९
रत्नागिरी ः वरवडे खंडाळा विद्यालयात देणगीदार कद्रेकर भगिनींचा सत्कार करताना वरवडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र विचारे.
---------

कद्रेकर भगिनींचा सत्कार
वरवडे विद्यालयातील वर्गखोलीच्या भित्तिपत्रकाचे अनावर
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १५ ः रत्नागिरी तालुक्यातील वरवडे माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार समारंभात वरवडे शाळेला वर्गखोली बांधकामासाठी दहा लाख रुपये देणगी दिलेल्या कद्रेकर भगिनींचा शिक्षण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे, शालिनी कद्रेकर, शकुंतला कद्रेकर, ॲड. एस. एम. देसाई, मनोहर विचारे आणि सुकेशनी सावंत उपस्थित होते. शालिनी भार्गव कद्रेकर यांनी शाळेला दिलेल्या दहा लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या वर्गखोलीच्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर दहावी परीक्षेत प्रथम आलेले आर्या बोरकर, प्रणव बळकटे, स्वरदा साठे, वरवडे शाळेतून प्रथम आलेले आर्या बोरकर, आर्या पावसकर, वर्षा खापले, बारावी विज्ञान शाखेमध्ये प्रथम आलेले तनिष्का पवार, विशाल मोरे, वैष्णवी पेडणेकर, बारावी वाणिज्य शाखेत प्रथम आलेले शर्वरी शिर्के, चैतन्य जुवेकर, अनिकेत जुवेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान चाफेरी गावचे सुपुत्र व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले व्यावसायिक सुशांत सावंत यांच्याकडून त्यांच्या आई सुकेशनी सावंत यांच्या हस्ते शाळेतील आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू मुलांना स्कूलबॅग, वह्या व छत्री या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: मला जीवे मारण्याचा प्रयत्न... मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा मोठा आरोप, व्हिडिओ पुरावा दाखवला

Stylish Rain Footwear: पावसाळ्यातही स्टायलिश दिसायचंय? कॅज्युअल कपड्यांसोबत घाला 'क्रॉक्स'!

GST Reform: जीएसटीमध्ये होणार मोठा बदल! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Latest Maharashtra News Updates : चाकण चौकातील वाहतूक कोंडीविरोधात स्थानिकांचे शांततामय आंदोलन

दुःखद बातमी: रितेश देशमुखच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, भावनिक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT