कोकण

वैभववाडी तालुक्यात असेल ‘महिलाराज’

CD

77761

वैभववाडी तालुक्यात असेल ‘महिलाराज’

३४ पैकी १८ ग्रामपंचायती आरक्षित; अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः तालुक्यातील ३४ पैकी १८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. पुर्वी जाहीर झालेल्या आरक्षणाच्या तुलनेत किरकोळ बदल आजच्या आरक्षण सोडतीत झाल्याचे चित्र आहे. आरक्षणात मोठे बदल होतील, या अपेक्षेने आलेल्या अनेक गावांमधील दिग्गजांचे पुन्हा स्वप्नच राहिले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी जाहीर केले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात चिठ्ठीद्वारे ही सोडत पद्धत पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, नायब तहसिलदार शिवाजी सुतार, नायब तहसीलदार सचिन निकम, कर्मचारी एम. एस. बाबर, कांचन मांजरेकर, बी. टी. मांजरेकर, एस. एम. नायगावकर, भाजपचे नासीर काझी, ठाकरे शिवसेनेचे मंगेश लोके, नंदू शिंदे, संजय सावंत, प्रदीप नारकर, जयसिंग रावराणे, रितेश सुतार, बाजीराव मोरे, अवधूत नारकर, नलिनी पाटील आदी उपस्थित होते.
आरक्षण सोडतीच्या सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी तीन ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये भुईबावडा, सडुरे-शिराळे या दोन ग्रामपंचायती अनुसुचित जातीतील महिलांसाठी तर भुईबावडा ही ग्रामपंचायत अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ९ चिठ्या काढल्या. त्यात पाच ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी असून यामध्ये मांगवली, कुसूर, तिरवडे तर्फ खारेपाटण, आखवणे भोम, करुळ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ४ चार ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता आरक्षित केल्या आहेत. यामध्ये एडगाव-वायंबोशी सोनाळी, सांगुळवाडी, नाधवडे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उर्वरित २२ ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. यामध्ये ११ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये निमअरुळे, नापणे, वेंगसर, कुंभवडे, मौदे, लोरे क्रमांक २, उपळे, कोकीसरे, कोळपे, तिथवली, आचिर्णे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर सर्वसाधारण प्रवर्गाकरीता हेत, नेर्ले, गडमठ, कुर्ली, उंबर्डे, नानीवडे, खांबाळे, अरुळे, नावळे, ऐनारी, तिरवडे तर्फ सौंदळ या ग्रामपंचायतीं सर्वसाधारण प्रवर्गाकरीता खुल्या राहील्या आहेत. या आरक्षण सोडतीत क्रितीका पवार (दुसरी) या मुलीने या सर्व चिठ्ठ्या उचलल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा ताबा; माजी महापौरांसह महापालिकेचे अधिकाऱ्यांना अडवले

SCROLL FOR NEXT