कोकण

कणकवलीचा प्रारूप आराखडा जाहीर

CD

77764

कणकवलीचा प्रारूप आराखडा जाहीर

२०१७ ची रचना कायम ः ८ गट आणि १६ गण निश्चित

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या गट आणि गण रचना प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यावर नागरिकांना २१ जुलै पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. तालुक्यात पूर्वीप्रमाणे ८ गट आणि १६ गण निश्चित करण्यात आले आहेत.
तालुक्यातील ६४ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या १०५ महसुली गावांचे नियोजन करत असताना प्रारूप आराखड्याप्रमाणे २०११ च्या लोकसंख्येवर आधारित प्रभाग रचना निश्चित केली आहे. त्यामुळे तालुक्यात खारेपाटण, कासार्डे, जानवली, फोंडाघाट, हरकुळ बुद्रुक, कलमठ, कळसुली आणि नाटळ हे ८ गट निश्चित केले आहेत. यात खारेपाटण गटांतर्गत तळेरे आणि खारेपाटण या दोन पंचायत समितीच्या गनाची प्रभाग रचना केली आहे. कासार्डे गटांतर्गत नांदगाव आणि कासार्डे असे दोन गण आहेत. जानवली गटाअंतर्गत बिडवाडी आणि जानवली गण निश्चित केले आहेत. फोंडाघाट गटाअंतर्गत लोरे आणि फोंडाघाट गण निश्चित केला आहे. हरकुळ बुद्रुक गटासाठी हरकुळ खुर्द आणि हरकुळ बुद्रुक असे गण आहेत. कलमठ गटासाठी वरवडे आणि कलमठ असे गण आहेत. कळसुली गटासाठी ओसरगाव आणि कळसुली असे गण आहेत. नाटळ गटासाठी नरडवे आणि नाटळ असे गण निश्चित केले आहेत.
तालुक्यामध्ये १ लाख १८ हजार ८९७ इतकी लोकसंख्या असून यामध्ये अनुसूचित जातीचे १० हजार ४४१ तर अनुसूचित जमातीमध्ये १ हजार ९ लोकसंख्या आहे. अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही जानवली गणामध्ये १० हजार १६ आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गाव नकाशासह प्रारूप प्रभाग रचना निश्चित केली आहे. मागील २०१७ ते २०२२ या कालावधीत जे प्रभाग होते त्याची रचना यावेळी बदलेली नाही. त्यामुळे यावर हरकती नोंदविण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही शासन आदेशनुसार हरकतीसाठी सात दिवसांचा कालावधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधी सोनं महागलं! चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Temple Tourism: पांडवांनी स्थापन केलेले मंदिर आता जगभरात गाजणार! सरकारकडून १ कोटींचा निधी मंजूर; स्वयंभू शिवलिंगाचे रहस्य काय?

Global Conflict: युद्धाचा तिढा कायम- पण निष्फळ वाटाघाटी पुन्हा सुरू?

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

SCROLL FOR NEXT