-rat१५p९.jpg-
P२५N७७६२३
चिपळूण ः आगाराला ‘रूट बोर्ड’चे वाटप करताना चिपळूण अर्बन बँकेचे संचालक
---------
‘चिपळूण अर्बन’कडून
आगारास ‘रूट बोर्ड’
चिपळूण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चिपळूण आगाराला चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेच्या सौजन्याने रूट बोर्डचे वितरण करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील विविध ५० मार्गांवर धावणाऱ्या एसटी बससाठी हे रूट बोर्ड उपयुक्त ठरणार आहेत. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली रूट बोर्ड चिपळूण डेपो व्यवस्थापक चव्हाण यांच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबू तांबे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय गांधी, बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष रहीमान दलवाई, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सतीश खेडेकर, संचालिका राधिका पाथरे यांच्यासह एसटी डेपोचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
वर्षावास कार्यक्रम
मालिकेचा प्रारंभ
चिपळूण ः चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती आणि तालुका धम्म कमिटी यांच्यावतीने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या चार महिन्यांच्या काळात आयोजित वर्षावास कार्यक्रमाला चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात प्रारंभ करण्यात आला. या वेळी तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रभाकर सकपाळ, मनोहर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना, पूजापाठ, सूत्रपठण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत व धम्म कमिटीचे अध्यक्ष मनोहर कदम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कुंभारखाणी बुद्रुकात
शालेय वस्तूंचे वाटप
सावर्डे ः कुंभारखाणी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील ओम अवधूत दत्त दिगंबर मठातर्फे परिसरातील शाळांतील १३० गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा उद्योजक संजय साळवी होते. दरवर्षी मठातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. या वेळी सरपंच वंदना सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते विकास सुर्वे, मठाचे संस्थापक सुरेश सुर्वे, दत्ताराम सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, केशव शितप, दिलीप सुर्वे आदी उपस्थित होते. १३० विद्यार्थ्यांना सहाशे वह्यांचे वितरण करण्यात आले.
‘लोकसंख्येवर नियंत्रण
राखणे गरजेचे’
सावर्डे ः आजच्या काळात लोकसंख्यावाढ झपाट्याने होत असल्यामुळे भौतिक संसाधने, शहरीकरण, शिक्षण, आरोग्य, वाहतूक व पर्यावरण आदी घटकांवर भयानक परिणाम होत असून, अशा वाढत्या लोकसंख्येवर वेळीच नियंत्रण राखणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रा. माधुरी जाधव यांनी व्यक्त केले. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ''जागतिक लोकसंख्या दिन'' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी प्राचार्य टी. वाय. कांबळे, प्रा. माधुरी जाधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.