- rat१६p१.jpg-
OP२५N७७८३९
रत्नागिरी ः उर्वी बर्वे नम्रता व्यास निमकर नीला कुलकर्णी मंदार गोखले प्रशांत धोंड
रत्नागिरी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘श्रावण कीर्तन सप्ताह’
चित्पावन ब्राह्मणसंघाचा पुढाकार ; २५ पासून महोत्सवास होणार सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळातर्फे गेली १३ वर्षे श्रावण कीर्तन सप्ताह साजरा केला जात आहे. यंदा रत्नागिरीसह देवरूख, चिपळूण, राजापूर, पावस, गुहागर व लांजा येथेही कीर्तन महोत्सव घेतला जाणार आहे. रत्नागिरीतील ब्राह्मण विद्यार्थी मंडळ सभागृहात २५ जुलैला या सप्ताहाचा प्रारंभ होईल.
कीर्तन महोत्सवाची सुरुवात २५ जुलैला सायंकाळी ५ वाजता ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहातील भगवान परशुराम सभागृहातील कीर्तनाने होईल. गोवा येथील युवा कीर्तनकार डॉ. उर्वी बर्वे कीर्तन सादर करणार आहेत. त्यांना श्रीधर पाटणकर व स्वरूप नेने साथ करतील. २६ जुलैला सायंकाळी ६ वाजता देवरूख येथील अभिरुची व श्री गणेश वेद पाठशाळेच्या सहकार्याने श्री गणेश वेद पाठशाळेत नम्रता व्यास- निमकर यांचे कीर्तन होईल. त्यांना ऑर्गनची साथ आशिष प्रभुदेसाई व तबलासाथ अभिजित भालेकर करतील. २७ जुलैला सायंकाळी ५ वाजता चिपळूण येथील ब्राह्मण साहाय्यक संघाच्या सहकार्याने संघाच्या सभागृहात होईल. त्यात नम्रता व्यास-निमकर (पुणे) कीर्तन करतील. त्यांना ऑर्गन वरद केळकर आणि तबलासाथ प्रथमेश देवधर करतील. २८ जुलैला सायंकाळी ६ वाजता राजापुरातील कीर्तन प्रेमी ग्रुप व संभाजी पेठ मित्रमंडळाच्या सहकार्याने श्री विठ्ठल मंदिरात कीर्तन होईल. त्यात प्रशांत धोंड कीर्तन सादर करणार असून त्यांना ऑर्गन आकाश लेले आणि तबलासाथ आर्यन कुशे करतील. २९ जुलैला सायंकाळी ६ वाजता पावसला आबा चिपळूणकर यांच्या सहकार्याने त्यांच्या राम मंदिरात नीला कुलकर्णी कीर्तन करतील. त्यांना ऑर्गन आकाश लेले आणि तबलासाथ वरद जोशी करणार आहेत. गुहागरच्या श्री व्याडेश्वर देवस्थानच्या सहकार्यातून ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता देवस्थानच्या सभागृहात मंदार गोखले यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना ऑर्गन चिन्मय सावरकर आणि तबलासाथ प्रकाश तांबे करणार आहेत. समारोपाचे कीर्तन ३१ जुलैला सायंकाळी ६ वाजता लांज्यातील ब्राह्मण साहाय्यक सेवा मंडळाच्या सहकार्याने होईल. लांजा येथे माऊली सभागृहात मंदार गोखले कीर्तन करतील. त्यांना ऑर्गन जगन्नाथ बेर्डे आणि तबलासाथ प्रदीप सरदेसाई करतील. सर्व ठिकाणच्या कीर्तनप्रेमी श्रोत्यांनी कीर्तनांना उपस्थित राहून कीर्तन भक्तीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळ आणि सर्व ठिकाणच्या सहयोगी संस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.