कोकण

सदर

CD

संतांचे संगती-----लोगो
( १० जुलै टुडे ३)

मराठी वर्षामध्ये पाचव्या क्रमांकावर येणारा महिना म्हणजे श्रावण महिना. आषाढ महिन्यात तुफान बरसणारा पाऊस, थोडा शांत झालेला असतो. भगवान श्री सूर्यनारायणाचे थोड्या काळासाठी का होईना दर्शन होऊ लागलेले असते. शेतीभातीच्या कामातून शेतकऱ्यांनाही थोडी उसंत मिळू लागलेली असते. आणि मग लवकरच या उत्साही वातावरणाचे उत्सवी वातावरणात रूपांतर होते.

-rat१६p५.jpg -
P25N77845
- धनंजय चितळे

------
गोष्टी कहाण्यांच्या
‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही प्रत्येकाचीच अवस्था या श्रावण महिन्यात होत असते. अनेक व्रते, अनेक सणही या महिन्यात असतात. जसे नारळीपौर्णिमा हा सण, जिवतीपूजन हे व्रत या महिन्यातच असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या धार्मिक कार्यामध्ये आहारविहारविषयक नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, त्या कार्याला व्रत असे म्हणतात. काही व्रते नेहमीच करायची असतात, त्यांना नित्य व्रते म्हणतात. तर जी व्रते ठराविक काळात करायची असतात, त्यांना नैमित्तिक व्रते म्हणतात. एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्याच्या व्रतांना कामनिक व्रते म्हणतात. श्रावण महिन्यातील काही व्रते तिथी प्रधान आहेत. जसे शिळा सप्तमीव्रत, नागपंचमी आदी. तर काही व्रते वार प्रधान आहेत जसं शिवामूठ, मंगळागौर पूजा, संपत शनिवार आदी. ही सर्व व्रते कशी करावीत ? याआधी ती व्रते कोणी केली? त्याचे कोणते फळ त्यांना मिळाले? याची माहिती देणाऱ्या कथा प्रसिद्ध आहेत. त्याच कथांना मराठी वाङ्मयामध्ये कहाण्या असे म्हणतात. पूर्वीच्या काळी अशा कथा रंगवून सांगणाऱ्या भगिनी होत्या, त्या घरोघरी जाऊन कथा सांगत असत. मोजक्या शब्दांची छोटी छोटी वाक्ये, शब्दांमध्ये साधलेले यमक यामुळे त्या कथांना एक छान लय असे. सर्वसाधारणपणे माणसाला गोष्टी ऐकायला आवडतात. पूर्वीच्या काळी सायंकाळी दिवे लागणी झाल्यावर कहाणी श्रवणाचा भाग होत असे. मौखिक परंपरेने हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवले गेले आणि हा कहाण्यांचा प्रवाह अखंड वाहत राहिला. एक गंमत म्हणून सांगतो महानुभाव संप्रदायाचे श्री चक्रधर स्वामी यांनी एका छोट्या मुलीची समजूत काढण्यासाठी एक गोष्ट सांगितली ती गोष्ट आपण आजही आपल्या घरातील छोट्या मुलांना आवडीने सांगतो. ती गोष्ट म्हणजे शेणाचं घर असणारा कावळा आणि मेणाचं घर असणारी चिमणी यांची कथा ! या कथेप्रमाणेच श्रावणातील कहाण्याही शेकडो वर्षे टिकल्या आहेत. आताच्या काळात संपूर्ण चतुर्मासासारख्या पुस्तकांमध्ये त्या वाचावयास मिळतात. आता श्रावण महिना खूप जवळ आला आहे, म्हणूनच येणाऱ्या काही भागांमध्ये आपण श्रावणातील कहाण्यांचे थोडेसे चिंतन करूया.
रोजचा कहाणी वाचनाचा कार्यक्रम श्रीगणेशाच्या कहाणीने होत असे. माझ्या लहानपणी आजीला वाचून दाखवतात दाखवता ही कहाणी कधी पाठ झाली ते मलाही कळले नाही. आजही ही कहाणी मला ‘संप्रूण’ आठवते. सर्व कहाण्यांची समाप्ती करताना सुफळ संपूर्ण मधील संप्रूण असाच लिहिलेला असायचा. पुढच्या आठवड्यात आपण या श्रीगणेशांच्या कहाणीचे चिंतन करू या.आपले चिंतन चांगले होण्यासाठी देवांची प्रार्थना करुया....!
गजमुख सुखदाता मानसी आठवावा|
मग विमळमतीचा योग पुढे करावा|
सुरवर मुनी योगी वंदिती धुंडिराजा |
सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ||
मंगलमूर्ती मोरया.

------------
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 'हे' नाव फायनल?

Cyclist Died during Tour: दुर्दैवी! शर्यतीदरम्यानच १९ वर्षांच्या सायकलपटूचा अपघातात मृत्यू; नेमकं काय झालं, जाणून घ्या

Nagpur Crime : पत्नीस पोटगी देण्यासाठी झाला सोनसाखळी चोर

Virar News : उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर वसई विरारमध्ये घडताहेत चर्चा

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT