कोकण

ग्रामकौशल्यतर्फे चिपळुणात कलाप्रदर्शन

CD

चिपळुणातील कलाप्रदर्शनाला प्रतिसाद
ग्रामकौशल्यचे आयोजन ; साडविलकर, जोगळेकर यांच्या कलाकृती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कला प्रदर्शनाला चिपळूणकर रसिकांनी उत्तम दाद दिली. चिपळूणमध्ये प्रथमच नीता नयन साडविलकर आणि प्राची मिलिंद जोगळेकर या दोन महिला कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ग्रामकौशल्यने भरविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
चिपळूण येथील या प्रदर्शनात अरण्यवाट येथील नारळाच्या करवंटीपासून बनलेल्या विविध कलावस्तूंनाही कलाप्रेमींनी दाद दिली. या प्रदर्शांत मृणाल जोशी यांनी ‘टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू’ कशा बनवल्या जाऊ शकतात, हे नागरिकांना समजावे म्हणून स्वतंत्र दालन होते. या प्रदर्शनावेळी पूजा निकम आणि रेहाना बिजले या उपस्थित होत्या. प्रदर्शनामध्ये चिपळूणवासीय रसिक प्रेक्षकांना निता नयन साडविलकर यांचे विविध आर्ट्स फॉर्म व त्यांची सृजनशीलता पाहता आली. ग्रामकौशल्यच्या विविध कलात्मक व शोभेच्या वस्तू या प्रदर्शनात कलाप्रेमींसाठी कलात्मकपद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाचे खास प्राची मिलिंद जोगळेकर यांचे जहागीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित झालेले कम्पोजिशन आर्ट प्रकारातले चित्र विशेष दर्शनीय ठरले. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मल्हार इंदुलकर, महेंद्र इंदुलकर, प्रदीप देवरुखकर, प्रशांत पवार, प्राची देवळेकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सुनीता गांधी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

PM Modi Reaction on GST Reform : ‘’मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, की..’’ ; GST 'रिफॉर्म'वर मोदींची पहिली प्रतिक्रिया!

Asia Cup 2025 साठी कर्णधार सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या दुबईला रवाना; कुठे करणार सराव, काय आहे वेळापत्रक; घ्या जाणून

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर काही लोकल रद्द, का आणि कधी? जाणून घ्या

Latest Marathi News Updates: हवामान विभागाकडून नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT