कोकण

अटल मॅरेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत कुडाळ हायस्कूल अव्वल

CD

77899
विश्वजित परीट, मृदुला देवगडकर, योगानंद सामंत

अटल मॅरेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत
कुडाळ हायस्कूल अव्वल

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः ‘अटल मॅरेथॉन’ या नीती आयोगाने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत टॉप-४०० मध्ये कमशिप्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे मॉडेल बसले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून या टॉप-४०० मधून टॉप-१५० मॉडेल शॉर्टलिस्ट केली गेली. त्यामध्ये कुडाळ हायस्कूलचे मॉडेल देशात सर्वप्रथम आले. या टीममध्ये विश्वजित परीट, मृदुला देवगडकर या कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना ‘अटल’ इन्चार्ज योगानंद सामंत यांनी मार्गदर्शन केले.
नीती आयोगाने श्री. सामंत यांचे विशेष कौतुक केले आहे. कुडाळ हायस्कूलमध्ये अटल लॅब स्थापन झाल्यापासून सलग तीन वेळा मॅरेथॉनमध्ये ही शाळा विजयी झाली आहे. विश्वजित परीट याने या तिन्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. प्रशालेच्या भागीरथी बागवे आयटी विभागाचे तीन शिलेदार सौ. लाड, हरेश चव्हाण आणि मकरंद राऊळ यांनी या प्रकल्पासाठी विशेष मेहनत घेतली आणि प्रशालेचा आयटी विभाग देश पातळीवर अव्वल आहे, हे सिद्ध केले. स्पर्धक आणि मार्गदर्शकांचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, सीईओ सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष का. आ. सामंत, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली, ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक नारायण साळवी आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dinesh Karthik: लॉर्ड्सवर जितेश शर्माला खरंच सिक्युरिटी गार्डने अडवलं? कार्तिकने सांगितलं Viral Video मागील खरी कहाणी

Odisha News: ओडिशात जोरदार निदर्शने; न्याय मिळेपर्यंत लढा! सौम्याश्रीच्या मृत्यूने ओडिशा ढवळले, बीजेडीचा सचिवालयावर मोर्चा रोखला

Slow Phone Charging: तुमचा फोन खूप हळू चार्ज होतोय? मग 'हे' 2 हॅक्स नक्की वापरा, तुम्हाला लगेच फरक दिसेल

Solapur Crime : डबा विसरली म्हणून घरी परतली..; स्नेहल बाथरूममध्ये गेली अन् श्रेयानं दरवाजा बंद करून..; कॉलेज तरुणीचा भयावह अंत

Rahul Gandhi: काश्मीरला राज्याचा दर्जा देणारे विधेयक आणा; राहुल गांधी आणि खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

SCROLL FOR NEXT