कोकण

करिअर संसद पदाधिकारी नियुक्त

CD

- rat१६p२.jpg-
P२५N७७८४०
सावर्डे : करिअर संसद सदस्यांबरोबर एस. पी. खानविलकर, टी. वाय. कांबळे,प्रा. जयसिंग चवरे आदी.

सावर्डे महाविद्यालयात ‘संसद पदाधिकारी’ नियुक्त
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १६ ः महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक युवा कौशल्य दिनाचे’ औचित्य साधून सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा विभागांतर्गत नुतन करियर संसद पदाधिकारी यांचा शपथविधी झाला.
महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी संस्था संचालक एस. पी. खानविलकर यांच्या हस्ते नूतन करिअर संसद पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संसद सदस्यांना गुप्ततेची शपथ दिली. याप्रसंगी खानविलकर म्हणाले, ‘महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची बुद्धी ही चौकस आणि वैचारिक असायला हवी. आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रम व्यतिरिक्त बाहेरील ज्ञानाशी विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी स्वतःमध्ये वाचनाची आवड जोपासली पाहिजे.’
या कार्यक्रमावेळी प्रास्ताविकात करिअर कट्टा विभागप्रमुख प्रा. जयसिंग चवरे यांनी करिअर कट्टा विभागाचा हेतू आणि या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती उपस्थितांना करून दिली. या वेळी प्राचार्य टी. वाय. कांबळे, डॉ. दीप्ती शेंबेकर, प्रा. पुजा आवले, प्रा. अवनी कदम, प्रा. माधुरी जाधव आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. सुनील जावीर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरणार म्हणजे काय? दुपारी ३ वाजेपूर्वी मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? मोठी अपडेट समोर

Solapur News:'साेलापूर महापालिकेतील ४३ लिपिकांच्या बदल्या'; ३८ कनिष्ठ, २ वरिष्ठ मुख्‍य लेखनिक, ३ वरिष्ठ श्रेणी लिपिकांचा समावेश

Latest Marathi News Updates: अटल सेतूवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

Gold Rate Today: सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीमध्येही झाली मोठी वाढ, किती आहे आजचा भाव?

US Open 2025: पाय, कंबर अन्‌ मानेच्या दुखापतीनंतरही जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत; भारताच्या मायाचीही घोडदौड

SCROLL FOR NEXT