- rat१६p८.jpg -
२५N७७८५१
समर्थ राऊत
----
ताम्हाणेतील
समर्थ राऊतचे यश
राजापूर ः तालुक्यातील ताम्हाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी समर्थ साक्षी सूर्यकांत राऊतने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करताना त्याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक पटकाविला आहे. त्याचे शाळा व्यवस्थपन समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, पालक, ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी यांनी अभिनंदन केले आहे. समर्थला मुख्याध्यापक व वर्गशिक्षक श्री. थोलबरे, माजी मुख्याध्यापक श्री. नाईक, श्री. गोडवे, श्री. साळुंखे, श्री. पवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
- rat१६p९.jpg
२५N७७८५२
- अर्णवी सप्रे
जुवाठीतील
अर्णवी सप्रेचे यश
राजापूर ः तालुक्यातील जुवाठी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील विद्यार्थिनी अर्णवी उत्तम सप्रे हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादने केले असून कोकण विभागात तिसरा आणि राज्यात आठवा क्रमांक पटकाविला आहे. अर्णवीच्या यशामध्ये शिक्षक, पालकांचे योगदान आहे.
---
-rat१६p१०.jpg -
P२५N७७८४७
स्वानंद ठाकूरदेसाई
-rat१६p११.jpg -
२५N७७८४८
स्मित कामतेकर
---
कौस्तुभ, स्मितचे यश
राजापूर ः शहरातील आरएसपीएम या इंग्लिश मेडीयम स्कूलच्या स्मित सचिन कामतेकर, स्वानंद कौस्तुभ ठाकूरदेसाई या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केले. स्मित कामतेकर याने तालुकास्तरीय तिसरा आणि जिल्हास्तरावर चौदावा, स्वानंद ठाकूरदेसाई याने तालुकास्तरावर पाचवा आणि जिल्हास्तरावर तिसावा क्रमांक पटकाविला आहे. त्यांना मुख्याध्यापक नीलेश पवार आणि सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
---
-rat१६p६.jpg
२५N७७८४९
- श्रीपाद चव्हाण
--
श्रीपाद चव्हाण
शिष्यवृत्तीत आठवा
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येखील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेचा विद्यार्थी श्रीपाद विठोबा चव्हाण याने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ९४.६६ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. तसेच याच शाळेतील सुश्लोक स्वप्निल गांगण यानेही ६९.३३ टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत १२४ वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेला शाळेतून सहा विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर गुरव, उपाध्यक्ष सिद्धेश चांदे, मुख्याध्यापिका सौ. तांबे, सुनील भांडेकर, सौ. धावडे, रायपाटणचे सरपंच नीलेश चांदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.