कोकण

उमरे धरण दुरुस्तीचा निकमांकडून पाठपुरावा

CD

उमरे धरण दुरुस्तीचा
निकमांकडून पाठपुरावा
संगमेश्वरः तालुक्यातील उमरे धरण गेली दोन वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या धरणाला गळती सुरू झाल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून गेल्या दोन वर्षांपासून या धरणात पाणी साठा पूर्ण क्षमतेने न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या परिसरातील उमरे, भीमनगर, वाडा वेसराड, भेकरेवाडी, मलदेवाडी, कळंबस्ते, फणसवणे, कोंड उमरे, अंत्रवली, कसबा कुंभारवाडी आदी सुमारे दहा गावातील लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या धरणाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव पुण्यातील सीडब्ल्युपीआरएसकडे प्रलंबित असून त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी आणि त्या प्रस्तावाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना पत्र दिले आहे. हा मुद्दा त्यांनी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्षही वेधले आहे. त्यामुळे धरणाच्या दुरूस्तीचे काम लवकर सुरू होईल अशी आशा आहे, असे कोंडउमरे गावचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.
-----
रस्त्याच्या दुतर्फा
कळंबस्तेत वृक्षारोपण
संगमेश्वरः तालुक्यातील कळंबस्ते शाळा व आदर्श शाळा भीमनगर येथील विद्यार्थ्यांना पारिजात संस्था आणि साटलेवाडी समाज सेवा मंडळ यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. लागवड केलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळीही बसवण्यात आली. त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रमात १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, लेखन साहित्य यांचे वाटप करण्यात आले. पारिजात संस्थेच्यावतीने शालेय वस्तूंचे, तर साटलेवाडी समाज सेवा मंडळाच्या वतीने वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रत्नाकर सनगरे, शाळा समितीचे माजी अध्यक्ष संतोष जुवळे, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग यांनी उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला.
----
राजस्थान उपमुख्यमंत्री
भेटले नरेंद्र महाराजांना
रत्नागिरी ः राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. उदयपूर विमानतळावर त्यांची भेट झाली. त्यांच्यासमवेत वल्लभनगर विभागाचे आमदार उदय लाल डांगी, रत्नागिरीच्या अरिहंत ग्रुपचे बांधकाम व्यावसायिक सुरेश सेठ गुंदेचा होते. या सर्वांनी जगदगुरु रामानंदाचार्य नरेंन्द्राचार्यजी यांचे उदयपूरमध्ये स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंचा उद्या मीरा रोड दौरा

SCROLL FOR NEXT