rat16p31.jpg
77971
मंडणगडः मौजे दहागाव येथे दिलावर वावघरकर यांच्या घराची पडझड होऊन झालेले नुकसान.
rat16p32.jpg
N77972
मुसळधार पावसामुळे लावणी केलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे.
------------
पुनर्वसू सरींमुळे मंडणगडात भातशेती पाण्याखाली
घरे, गोठे यांना फटका ; पावसामुळे ११ लाखांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ ः पुनर्वसू नक्षत्रात बरसलेल्या सरींनी मंडणगडला चांगलेच झोडपले. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या सरींवर सरींनी तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. या मुसळधार पावसांत घरे, गोठ्यांसह शेतीचेही नुकसान झाले. मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ११ लाख ६० हजार ४४० रुपयांची नैसर्गिक हानी झाली आहे.
दोन दिवस सतत पावसामुळे १५ जुलैला तालुक्यातील मौजे दहागाव येथील ग्रामस्थ दिलावर कादिर वावघरकर यांच्या घराची पडझड झाली. यात घराचे ३७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. आतापर्यंत अंशतः घरे २ लाख २९ हजार ३९०, अंशतः गोठे २ लाख ९७ हजार २५०, मृत जनावरे ३५ हजार, संरक्षक भिंत ९७ हजार, शाळा ५० हजार, अंगणवाडी ३५ हजार, दुकाने ३ लाख, पोल्ट्री फार्म ७९ हजार असे नुकसान झाले आहे.
दरम्यान, बुधवारी (ता. १६) पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. १६ जुलैला तालुक्यात ८८.७५ मिमी पावसाची नोंद झाली. यात मंडणगड महसूल मंडळात सर्वाधिक ११० मिमी, तर म्हाप्रळ महसूल मंडळात सर्वात कमी ६७ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात ६२ हजार ७५० रुपयांच्या नुकसान निधीचे वाटप करण्यात आल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.