कोकण

वीज समस्येबाबत तातडीने उपाय योजा

CD

77986
वीज समस्येबाबत तातडीने उपाय योजा

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर : ‘सावंतवाडी’प्रश्‍नी मंत्रालय बैठकीत निर्देश

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ ः सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदारसंघातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार दीपक केसरकर यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मुंबई मंत्रालयात अधिवेशन काळात विजेच्या विविध समस्यांवर व प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली. यात राज्यमंत्री बोर्डीकर यांनी उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विजेच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार केसरकर, आमदार नीलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, आमदार शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र आदी उपस्थित होते. बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातून विजेची हायटेन्शन लाईन गेली आहे. शासनाच्या धोरणानुसार त्या लाईनला टेंपिंग देता येत नाही. त्यामुळे या भागातील अनेक उद्योगधंदे वीज पुरवठ्यापासून वंचित आहेत. येथील परिस्थिती विचारात घेता याठिकाणी टेंपिंग यंत्रणा उभारावी. तसेच दोडामार्ग तालुका डोंगराळ व दुर्गम भागामध्ये बऱ्याच वेळा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. त्यामुळे येथील नागरिकांना १ ते २ आठवडे विजेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे वझरे येथील शासकीय जागेत शासनाच्या ‘आरडीएसएस’ योजनेंतर्गत शासनाकडे प्रस्तावित असलेल्या स्वतंत्र विद्युत सब स्टेशनला मंजुरी मिळावी. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्प क्षेत्रालगत होत असलेल्या अम्युझमेंट पार्क प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर किंवा सबस्टेशन करावे. तसेच तिलारी धरण प्रकल्पावर ‘महालक्ष्मी’ ही कंपनी दोडामार्ग तालुक्यासाठी विद्युत पुरवठा गेली बरीच वर्षे करीत आहे. गेल्या एक वर्षापूर्वी कराराची मुदत संपल्याने या कंपनीकडून दोडामार्ग तालुक्याचा विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे या भागामध्ये विजेची कमतरता भासत आहे. पुनश्च करार करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, त्याचा तात्काळ विचार व्हावा.
सावंतवाडी शहरासाठी भूमीगत विद्युतवाहिनी (केबल) टाकण्याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मतदारसंघातील बहुतांश भाग हा दुर्गम व डोंगराळ असल्याने याठिकाणी ३३ केव्ही वाहिन्या या भूमीगत केल्यास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण शून्य टक्क्यावर येईल. वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागातील वीज प्रश्न लक्षात घेता चिपी विमानतळ येथे मंजूर असलेले उपकेंद्र तात्काळ कार्यान्वित व्हावे. सिंधुदुर्गमध्ये वारंवार चक्रीवादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे विजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. त्यासाठी नव्याने विजेचे खांब उभारण्याचे काम मंजूर केले होते. याबाबत तात्काळ विचार व्हावा.
सावंतवाडी इन्सुली ते दोडामार्ग येथे खासगी कंपनीपर्यंत नवीन लाईन टाकणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या पर्यटनाचा विचार करता सिंधुरत्न योजनेंतर्गत पर्यटनवाढीसाठी टेंड, कॉटेनीस, तत्सम्‌ निवासी संकुले (बंगलो सिस्टिम) ही योजना राबविण्यात येत असून, त्या जिल्ह्यातील प्रत्येक घरासाठी राबविता यावी, या अनुषंगाने याला व्यावसायिक दराने वीजपुरवठा न आकारता घरगुती दराने वीजपुरवठा करावा आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंचा उद्या मीरा रोड दौरा

SCROLL FOR NEXT